रंगोली चंडेलचा आदित्य पांचोलीवर गंभीर आरोप, कंगनाकडून जबरदस्ती घेतले १ कोटी रुपये Aditya Pancholi | Aditya Pancholi Case | Kangana Ranaut | Rangoli Chandel |

रंगोली चंडेलचा आदित्य पांचोलीवर गंभीर आरोप, कंगनाकडून जबरदस्ती घेतले १ कोटी रुपये Aditya Pancholi | Aditya Pancholi Case | Kangana Ranaut | Rangoli Chandel |

Aditya Pancholi | Aditya Pancholi Case | Kangana Ranaut | Rangoli Chandel | आदित्यने कंगना बेघर असून तिला तीन महिने राहायला जागा दिल्याचं सांगून पैसे वसूल केले होते.

  • Share this:

मुंबई, 28 जून- बॉलिवूड अभिनेता आदित्य पांचोलीसाठी येणारा प्रत्येक दिवस हा संकटंच घेऊन येत आहे. काल २७ जून रोजी वर्सोवा पोलिसांनी आदित्य पांचोली विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्या अंतर्गत त्याच्यावर बलात्कार, मारहाण करणं आणि धमकवण्याची कलमं लावण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून आता कंगना रणौतची बहीण रंगोली चंडेलने आदित्यवर कंगनाकडून धमकावून १ कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला आहे. रंगोलीने तिच्या ट्विटर अकाउंटवरून एका मागोमाग एक ट्वीट करत हा गंभीर आरोप केला.

विराटच्या फेवरेट स्टार क्रिकेटपटूला डेट करतेय सुनील शेट्टीची मुलगी

या पाच कारणांमुळे कबीर सिंगचा केला जातोय विरोध

यात रंगोलीने लिहिले की, ‘आदित्यविरोधात २००७ मध्येच शोषण आणि धमकावून १ कोटी रुपये वसूल करण्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. तेव्हा आदित्यने कंगना बेघर असून तिला तीन महिने राहायला जागा दिल्याचं सांगून पैसे वसूल केले होते.’  एवढंच बोलून रंगोली थांबली नाही तर तिने पुढच्या ट्वीटमध्ये लिहिले की, ‘त्याला यानंतरही अजून पैसे हवे होते. २०१६ मध्ये त्याचा शेवटचा मेसेज मला आला होता. हा मेसेज मी पोलिसांनाही दाखवला. आता गुन्हा नोंदवला गेला आहे. तिच्याकडे (कंगना) या सर्वांसाठी वेळ नाहीये.’

सनी लिओनीला या व्यक्तीने मारली गोळी, क्षणाधार्त जमिनीवर कोसळली!

यानंतर रंगोलीने लिहिले की, ‘मात्र पांचोली आणि त्याची पत्नी यांच्याकडून दररोज ज्या गोष्टी समोर येतात त्या सर्वासाठी भरपूर वेळ पाहिजे. कंगना सध्या व्यग्र आहे. तिच्या कामावर याचा कोणताही परिणाम होऊ नये यासाठी तिच्या बाजूने मी या प्रकरणावर बोलत आहे.’

करोडपतीच्या सेटवर सयाजी शिंदेंनी केला सरप्राईज संदर्भातला खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 28, 2019 06:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading