मुंबई, 19 जून : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि अभिनेता हृतिक रोशन यांच्यातील वाद थांबण्याचं नाव घेत नाही आहे. दोघंही सतत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अशातच हृतिकची बहीण सुनैना रोशननं एक ट्वीट करत कंगना रनौतला आपला पाठिंबा दर्शवला होता. त्यानंतर आता कंगनाची बहीण रंगोली चंडेल हिनं हृतिक रोशनवर गंभीर आरोप केला आहे. सुनैनाला हृतिक रोशन मारहाण करत असल्याचं तिच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. यासोबतच तिनं रोशन कुटुंबीयांवर एकमागोमाग एक ट्वीट केले आहेत. यासोबतच रंगोलीनं रोशन कुटुंबीय सुनैनाला मारहाण करण्यामागचं कारणही सांगितलं आहे. हे सर्व सुनैनानं स्वतः कंगनाला फोन करून सांगत तिच्याकडे मदत मागितल्याचा दावाही रंगोलीनं केला आहे.
Sunaina Roshan is asking Kangana for help, her family is physically assaulting her because she is in love with a Muslim man from Delhi, last week they got a lady cop who slapped her, her father also hit her, her brother is trying to put her behind bars..(contd)
कंगना रनौतची बहीण रंगोली चंडेल हिनं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं, ‘हृतिक रोशन आणि त्याचे कुटुंबीय सुनैनाला मारहाण करतात तसेच तिला त्रास देतात. ही गोष्ट सुनैनानं स्वतः फोन करून कंगनाला तिच्या सोबत होत अत्याचारांबद्दल सांगितलं आणि मदत मागितली होती.’ रंगोलीच्या ट्वीटनुसार सुनैनाचे दिल्लीतील एका दुसऱ्या जातीतील मुलाशी प्रेमसंबंध आहेत. यामुळे रोशन कुटुंबीय सुनैनाला मारहाण करत असल्याचं समजतं. एवढंच नाही तर मागच्या आठवड्यात एका महिला पोलिस कर्मचाऱ्याकडून सुनैनाला कानशीलात मारायला लावली होती. असंही रंगोलीचं म्हणणं आहे.
(Contd).... I fear her dangerous family might harm her, we want to make this public because Sunaina calling Kangana and crying all the time, Kangana doesn’t know how to help her...(contd)
रंगोलीनं तिच्या एका ट्वीटमध्ये लिहिलं, सुनैनाचे वडील तिला मारहाण करतात. तिचा भाऊ तिला घरात बंद करून ठेऊ इच्छितो. मला भीती वाटते की, हे सर्व मिळून तिला नुकसान पोहोचवतील. मी ही गोष्ट सार्वजनिक यासाठी केली कारण, सुनैना नेहमीच कंगनाला कॉल करून रडत असते. कंगनाला समजत नाही की, तिला कशी मदत करावी त्यामुळे तिनं सुनैनाचा नंबर सध्या ब्लॉक करून ठेवला आहे. पण आम्हाला दोघींनाही तिच्या सुरक्षेची चिंता आहे. मला आशा आहे की, या ट्वीटमुळे रोशन कुटुंबीयांना भीती वाटेल अणि ते सुनैनावर अत्याचार करणं थांबवतील.
I agree, but Kangana was so distressed after so many calls from Sunaina, Roshans are capable of harming Kangana but this time around I am very careful I myself also spoke to Sunaina, I have kept all the messages and recordings, Sunaina is in trouble for sure...(contd) https://t.co/KJ6Kl6WCss
एका ट्वीटमध्ये रंगोलीनं सांगितलं की त्यांनी सुनैनाच्या परवानगीनेच आम्ही ही गोष्ट सार्वजनिक केली आहे आणि आमच्याकडे सर्व कॉल्स आणि मेसेज सांभाळून ठेवले आहेत. काही दिवसांपूर्वी हृतिक रोशनची बहीण सुनैना रोशनने कंगना आणि तिला माफी मागण्यासाठी बोलावलं होतं. दरम्यान सुनैनैने स्वतः कंगनाचं नाव लिहित एक ट्वीट केलं. या ट्वीटमध्ये तिने कंगनाला पाठिंबा दिल्याचं म्हटलं आहे. हृतिकची बहीण सुनैनाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एक मेसेज लिहिला. आपल्या पोस्टमध्ये तिने लिहिले की, ‘मी कंगनाचं समर्थन करते.’ सुनैनाच्या या ट्वीटने हे स्पष्ट होतं की ती कंगनाच्याच बाजूने आहे. पण अजूनपर्यंत सुनैना आणि रोशन कुटुंबात नक्की कोणते वाद आहेत हे अजून कळू शकलेले नाही.