करण जोहर सांगतो, ‘कोणासोबत सेक्स करायचं’; रंगोलीच्या आरोपांनी बॉलिवूडकरांची उडाली झोप

करण जोहर सांगतो, ‘कोणासोबत सेक्स करायचं’; रंगोलीच्या आरोपांनी बॉलिवूडकरांची उडाली झोप

रंगोलीने सोशल मीडियावर स्वयंघोषीत सिनेसमीक्षक कमाल आर खानच्या ट्वीटला उत्तर देताना असं काही म्हटलं की ज्याने करणला राग येऊ शकतो.

  • Share this:

मुंबई, 27 मे- करण जोहर आणि कंगना रणौत या दोघांमधला घराणेशाहीचा वाद तर साऱ्यांनाच माहीत आहे. आतापर्यंत कंगनाने करणवर अनेक आरोप केले. तसेच सिनेसृष्टीत घराणेशाहीला प्रोत्साहन दिल्याचा आरोपही तिने केला होता. गेल्या काही वर्षांपासून हा वाद सुरू असला तरी काही दिवसांमध्ये यावर कोणी भाष्य केलं नव्हतं. पण आता या वादाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. यावेळी कंगनाची बहीण रंगोलीने करणवर गंभीर आरोप केले आहेत. रंगोलीने सोशल मीडियावर स्वयंघोषीत सिनेसमीक्षक कमाल आर खानच्या ट्वीटला उत्तर देताना असं काही म्हटलं की ज्याने करणला राग येऊ शकतो.

शाहरुखच्याआधी सलमाननेच घेतला असता मन्नत बंगला, पण...

केआरकेने ट्वीट करत म्हटलं होतं की, ‘माझ्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करणने इशानला धर्मा प्रोडक्शच्या बाहेर केलं आहे. इशानने केलेल्या असभ्य वर्तनामुळे त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचं म्हटलं आहे. आता तो इशानसोबत एकही सिनेमा करणार नाही.’ केआरकेच्या या ट्वीटला उत्तर देताना रंगोलीने म्हटलं की, ‘करण ज्यांना लॉन्च करतो त्यांच्या मिळकतीचा फक्त तो मोठा हिस्साच घेत नाही तर कोणते कपडे घालायचे आणि कोणासोबत सेक्स करावं हेही तोच ठरवतो.’

Bigg Boss Marathi 2- आता हे 15 मराठमोळे सेलिब्रिटी भिडणार एकमेकांना

रंगोलीने पुढे लिहिले की, ‘नफ्यात वाटा घेण्याची गोष्ट असेल तर अनेक हॉलिवूड प्रोडक्शन हाउस असं करतात. पण आपल्या ब्रँडनुसार ब्रेकअप करणं आणि पॅचअप करणं कोणत्याही स्वाभिमानी व्यक्तिला मान्य नसेल. करिअर गेलं खड्यात मनः शांती जास्त गरजेची आहे. स्वतःच्या नजरेत जर पडलात तर पैसे नक्की कमवाल पण खऱ्या अर्थाने आयुष्यात काही करू शकत नाही.’

विवेक ओबेरॉयच्या त्या ट्वीटचं उत्तर देणार होता अभिषेक, ऐश्वर्याने घेतला हा निर्णय

जर तुम्हाला वाटत असेल की फक्त कंगनाची बहीण रंगोलीच तिच्या यशाबद्दल समोर येऊन बोलते तर तसं काही नसून कंगनाची आई आशा रणौतही मुलीच्या यशाबद्दल मोकळेपणाने बोलते. नुकत्याच झालेल्या मदर्स डेला आशा यांनी कंगनाच्या यशाबद्दल आपलं मत दिलं होतं. त्यांच्यामते, कंगना ज्या पद्धतीने कोणालाही न घाबरता काम करते त्याचा त्यांना अभिमान आहे.

बाबांच्या आठवणीत भावुक झाले रितेश- जेनेलिया देशमुख, म्हणाले...

राज्यात मान्सून लांबण्याची शक्यता, या आणि इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी

First published: May 27, 2019, 11:13 AM IST
Tags:

ताज्या बातम्या