'SOTY 2'वरून कंगनाची बहीण रंगोलीनं करण जोहरवर साधला निशाणा

'SOTY 2'वरून कंगनाची बहीण रंगोलीनं करण जोहरवर साधला निशाणा

2012मध्ये 'स्टूडंट ऑफ द इयर' रिलीज झाल्यावर बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या मुद्द्यावरून कंगना रनौतनं करण जोहरवर टीका केली होती.

  • Share this:

मुंबई, 11 मे : करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनची निर्मिती असलेला 'स्टूडंट ऑफ द इयर 2' नुकताच रिलीज झाला. या सिनेमातून तारा सुतारिया आणि अनन्या पांडे यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. 2012मध्ये आलेल्या 'स्टूडंट ऑफ द इयर'चा हा सिक्वेल असून 'स्टूडंट ऑफ द इयर'मधूनही आलिया भट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पण त्यानंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या मुद्द्यावरून कंगना रनौतनं करण जोहरवर टीका केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा कंगनाच्या बहीणीनंही करण जोहरवर निशाणा सोधला आहे.

करण जोहरचा 'स्टूडंट ऑफ द इयर 2' रिलीज झाल्यानंतर एका ट्विटमध्ये असा दावा करण्यात आला होता की, 'धर्मा प्रॉडक्शनच्या एका कर्मचारी महिलेनं थिएटरमध्ये सिनेमा पाहायाला जाणाऱ्या लोकांना सिनेमा पाहून सिनेमाबाबत पॉझिटीव्ह रिव्ह्यूव द्यायला सांगत होती.' या ट्वीटवरून रंगोलीनं करणवर टीका करण्याची संधी अजिबात सोडली नाही. या ट्वीटवर लगेचच रिप्लाय करत रंगोलीनं लिहिलं, 'हाहाहा नॉटी पापा जो'

काही दिवसांपूर्वी तारा सुतारियानं कंगना रनौतला आपली रोल मॉडेल म्हटलं होतं आणि त्यानंतर कंगनाच्या बहीणीनं ताराचं कौतुकही केलं होतं. पण नंतर मात्र तिनं घुमजाव करत दीपिका आणि प्रियांका आपल्या आदर्श असल्याचं म्हटलं होतं. ताराच्या अशाप्रकारच्या विधानामागे करण जोहर असल्याचं म्हटलं जात होतं. पुनीत मल्‍होत्राने दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात टायगर श्रॉफ, अनन्या पांडे, तारा सुतारिया यांच्या व्यतिरिक्त आदित्‍य सील, समीर सोनी, गुल पनाग, अभिषेक बजाज आणि मनोज पाहवा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Sacred Games 2चं नवं पोस्टर काय सांगतं , गणेश गायतोंडेची पुन्हा दहशत ?

सारा अली खाननं सांगितलं परफेक्ट फिगरचं सिक्रेट, सिनेमात येण्यापूर्वी 96 किलो होतं वजन

'तिचा सिनेमा पाहायला तर साधा कुत्राही गेला नाही,' ब्रेकअपनंतर सलमानने काढला तिच्यावर राग

First published: May 11, 2019, 7:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading