हृतिक आणि तापसीनंतर आता दीपिका पदुकोण रंगोली चंडेलच्या निशाण्यावर

हृतिक आणि तापसीनंतर आता दीपिका पदुकोण रंगोली चंडेलच्या निशाण्यावर

रंगोलीनं आता एक व्हिडिओ ट्वीट करत दीपिकावर टीका केली आहे.

  • Share this:

मुंबई, 6 जुलै : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतची बहीण दीपिका पदुकोण रंगोली चंडेल सतत काही ना काही कारणानं सोशल मीडियावर चर्चेत असते. कंगनाला कोणी काही बोललं की, लगेचच रंगोली तिची बाजू घेऊन कोणालाही सुनवायला मागे पुढे पाहत नाही. मागच्या काही दिवसात हृतिक रोशन आणि तापसी पन्नूला टार्गेट करून टीका केल्यानंतर रंगोलीनं तिचा मोर्चा आता अभिनेत्री दीपिका पदुकोणकडे वळवला आहे. रंगोलीनं आता एक व्हिडिओ ट्वीट करत दीपिकावर टीका केली आहे.

कंगानाची बहीण रंगोली चंडेलनं एक व्हिडिओ रिट्वीट केलं असून त्याला तिनं, ‘हे काय चालू आहे. हे डिप्रेशन आहे का?  तेच लोक आहेत ज्यांना मेंटल या शब्दाशी समस्या होती. पण ज्यांना डिप्रेशन होतं ते तर लग्नाच्या वरातीप्रमाणे नाचत आहेत. किती वाईट प्रकार आहे. अशाप्रकारे डिप्रेशनच्या नावाखाली सहानुभूती मिळवण्याचा.’ असं कॅप्शन दिलं आहे. हा बुमरँग व्हिडिओ दीपिकाच्या 'द लिव लव लाफ' या संस्थेनं त्यांच्या ऑफिशिअल ट्विटरवरून शेअर केला आहे. तोच व्हिडीओ रंगोलीनं रिट्विट केला.

पहिल्याच भेटीत रणवीरनं केलं होतं असं काही, जे दीपिका अद्याप विसरू शकली नाही

कंगनाचा ‘जजमेंटल है क्या’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचं नाव या आधी ‘मेंटल है क्या’ असं होतं मात्र नंतर त्यावर काही डॉक्टर्सनी आक्षेप घेतल्यानंतर ते बदल्याण्यात आलं. दीपिकाचं फाउंडेशन 'द लिव लव लाफ'ने सुद्धा या टायटलवर आक्षेप घेतला होता. त्यावरूनच रंगोलीनं आता दीपिका पदुकोणला टार्गेट केलं आहे.

बॉलिवूडचे 'हे' दोन स्टार सिनेमे सोडून बिहारमध्ये करत आहेत शेती

काही दिवसांपूर्वी रंगोलीनं अभिनेत्री तापसी पन्नूवरही टीका केली होती. तापसीला तिनं कंगानाची स्वस्त कॉपी असं म्हटलं होतं. यानंतर रंगोलीचं हे ट्वीट ज्यावेळी अनुराग कश्यपनं पाहिलं त्यावेळी त्यानं त्यावर, ‘रंगोली हे खूप जास्त होत आहे आणि खूप निराशजनकही आहे. मला समजत नाही की मी यावर काय प्रतिक्रिया देऊ. तुझी बहीण आणि तापसी दोघांसोबतही मी काम केलं आहे. हे सर्व समजण्याच्या पलिकडे आहे. एका ट्रेलरची स्तुती करणं म्हणजे त्या व्यक्तीची स्तुती करणं असतं. ज्यात कंगनासुद्धा येते.’ अशी कमेंट केली होती. ज्यावर रंगोलीनं अनुरागलाही बरंच सुनावलं होतं.

बॉलिवूडच्या या 5 अभिनेत्रींनी नाकारले तीनही खानांचे सिनेमे

=============================================================

SPECIAL REPORT: सोशल मीडियावर व्हायरल होणारं बॉटल कॅप चॅलेज काय आहे?

First published: July 6, 2019, 9:14 AM IST

ताज्या बातम्या