Home /News /entertainment /

'मी इतकी व्यसनाधीन झाले होते की चोरून सिगरेट ओढायचे', रामनवमीच्या मुहूर्तावर कंगनाने VIDEO मधून सांगितलं सत्य

'मी इतकी व्यसनाधीन झाले होते की चोरून सिगरेट ओढायचे', रामनवमीच्या मुहूर्तावर कंगनाने VIDEO मधून सांगितलं सत्य

रामनवमीनिमित्त अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) देखील एक संदेश तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला आहे. यामध्ये तिने तिच्या आयुष्याची गाडी रुळावर आणण्यासाठी श्रीरामांची कशी मदत झाली हे सांगितलं आहे.

    मुंबई, 02 एप्रिल : आज रामजन्मोत्सवाचा म्हणजेच रामनवमीचा दिवस आहे. देशातील अनेक ठिकाणी आजचा दिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो. मात्र कोरोना व्हायरस लॉकडाऊन (Coronavirus Lockdown)मुळे देशातील अनेक मंदिरं बंद आहेत. रामनवमीचा उत्सव देखील साजरा करण्यात आला नाही. अनेकांनी सोशल मीडियावरून रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांची मत मांडली आहेत. रामनवमीनिमित्त अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) देखील एक संदेश तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केला आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत रामलल्लाचं भारतामध्ये असणारं महत्त्व स्पष्ट केलं आहे. (हे वाचा-Coronavirus : देशातील परिस्थितीबाबत ट्विंकलने 2015 मध्येच केली होती भविष्यवाणी) या व्हिडीओमध्ये कंगना म्हणत आहे की, 'राम या जमिनीवर जन्माला आलेले सर्वात महत्त्वाचे आयकॉन आहेत. त्यांनी त्यागाची भूमिका शिकवली. मला ही गोष्ट मी अठरा वर्षांची असताना लक्षात आली. एका चित्रपटातील दृश्यासाठी मला सिगारेट ओढायची होती. तेव्हा लोकांना असं वाटलं की मला याची सवय होईल की काय आणि तसंच झालं. मी सिगरेटच्या व्यसनाधीन झाले, सर्वांनी विरोध केला तरीही मी सिगरेट ओढायचे. इतकी की सिगरेटचं पाकिट कायम माझ्याजवळ असायचे. त्यावेळी माझ्या योग गुरूंनी सांगितलं की, तुम्ही तुमच्या मनावर नियंत्रण ठेऊ शकता आणि त्याग करायला शिका. तेव्हा मला राम यांच्या त्यागाच्या भावनेची आठवण झाली आणि मी माझ्या आयुष्यात बदल घडवला.' ती पुढे म्हणाली की, 'महात्मा गांधी सुद्धा रामराज्य आणि रामाच्या आदर्शांना मानत होते.'
    कंगनाची टीम सोशल मीडियावर तिचे असेच काही व्हिडीओ नेहमी शेअर करत असते. आज रामनवमीनिमित्त त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या