नवी दिल्ली, 13 ऑगस्ट : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौतने (Kangana Ranaut) आपल्या आगामी धाकड (Dhaakad) चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. धाकड चित्रपटात कंगना अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे. तिने या चित्रपटाच्या रॅपअप पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचा बोल्ड लूक समोर आला असून एका किनाऱ्याजवळ ती पोज देताना दिसतेय.
नेहमीच वादात असलेल्या कंगनाला अनेकदा ट्रोल केलं जातं. अनेक कारणांनी चर्चेत असणारी कंगना आता पुन्हा एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. तिने शेअर केलेल्या फोटोमुळे तिला ट्रोल करण्यात आलं आहे. कंगनाने धाकड रॅपअप पार्टीच्या शेअर केलेल्या फोटोमध्ये एक ब्रालेट घातलेलं दिसतेय. त्यामुळेच ती ट्रोल झाली आहे.
एकीकडे अनेक जण तिच्या या लूकचं, तिच्या सौदर्याचं कौतुक करत आहेत, तर दुसरीकडे अनेकांनी तिला ट्रोलही केलं आहे. अनेकांनी तिला कपड्यांमुळे ट्रोल केलं आहे. आतापर्यंत कंगनाने अनेक अभिनेत्रींना त्यांच्या कपड्यांवरुन कमेंट केल्या आहेत. आता तिने स्वत:ही अशाप्रकारच्या कपड्यांमध्ये फोटो पोस्ट केल्याने तिला ट्रोल केलं जात आहे. दुसऱ्यांच्या पोस्टवर कमेंट करते, आता हा फोटो अपलोड करताना तु कोणताही विचार केला नाही? असा सवाल ट्रोल करणाऱ्यांकडून केला जात आहे.
View this post on Instagram
Bisexual आहे Bigg boss ची ही स्पर्धक; मुलांबाबत आकर्षण पण...; लग्नाबाबत उलगडलं मोठं गुपित
कंगना तिच्या या बोल्ड लूकमुळे चर्चेत आहे. कपड्यांवरुन अनेकदा इतर अभिनेत्रींना सल्ले देते आणि स्वत: अशा कपड्यांमध्ये पोज देऊन फोटो पोस्ट करते, असं म्हणत तिला ट्रोल केलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Kangana ranaut