मुंबई 5 फेब्रुवारी : मागील काही दिवसांपासून बॉलिवूड क्वीन कंगना रणौत (Kangana Ranaut) आपल्या ट्विटमुळं चांगलीच चर्चेत आहे. यासोबतच अभिनेत्री आपल्या धाकड (Dhakaad) या सिनेमाच्या चित्रीकरणातही व्यग्र आहे. या चित्रपटासाठी कंगना भरपूर मेहनत घेत असून तिनं नुकतंच शेअर केलेल्या एका ट्विटमधून असं दिसतंय, की निर्मातेही या सिनेमासाठी भरपूर खर्च करत आहेत. कंगनानं सांगितलं, की तिच्या या सिनेमासाठी 25 कोटी रूपये खर्चून एक सेट तयार केला गेला आहे.
अॅक्शन सीनवर खर्च केले 25 कोटी -
कंगनानं एक अॅक्शन सीन शेअर करत म्हटलं, की मी कोणताही असा दिग्दर्शक पाहिला नाही, जो सरावाला इतका वेळ आणि महत्तव देतो. काल रात्रीपासून आतापर्यंतचा सगळ्यात मोठा अॅक्शन सीन शूट केला जाईल. मात्र, मी त्याची तयारी पाहून थक्क आहे. मला खूप काही शिकायला मिळतं आहे. 25 कोटीपेक्षा जास्त पैसे केवळ या अॅक्शन सीक्वेंसवर खर्च केल्याचं तिनं म्हटलं आहे.
Never saw a director who gives so much time and importance to rehearsals, one of the biggest action sequences will be shot from tomorrow night but amazed with the amount of prep, getting to learn so much, more than 25 crores being spent on a single action sequence #Dhaakad pic.twitter.com/zbU70VOT4b
— Kangana Ranaut (@KanganaTeam) February 5, 2021
ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार चित्रपट -
धाकड हा एक स्पाय-अॅक्शन सिनेमा आहे. यात कंगना एका एजंट अग्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच सिनेमाचं पोस्टर समोर आलं होतं. यात कंगना हातामध्ये तलावर घेऊन बसली होती आणि तिच्या मागे रक्तानं माखलेले मृतदेह होते. या पोस्टरची तुलना अनेकांनी हॉलिवूड सिनेमा Tomb Raider सोबत केली होती.
कंगनानं हे पोस्टर शेअर करत चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणाही केली होती. तिनं लिहिलं होतं, की ''वो बेखौफ और खतरनाक है. वो एजेंट अग्नि है" भारताचा पहिला महिला प्रधान अॅक्शन थ्रिलर चित्रपट धाकड 1 ऑक्टोबर 2021 ला (Dhakaad Release Date) चित्रपटगृहात येईल. हा सिनेमा रजनीश राजी घई दिग्दर्शित करत आहेत. सध्या या सिनेमाचं चित्रीकरण मध्य प्रदेशात सुरू आहे. धाकड हा सिनेमा सोहेल मकलाई यांची निर्मिती आहे. कंगनासोबत या चित्रपटात अर्जून रामपालही झळकणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kangana ranaut, Upcoming movie