आता बॉलिवूड अभिनेत्रींवर बरसली कंगना, म्हणाली...

मणिकर्णिका सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी कंगना रनौत आता बॉलिवूडमधील इतर अभिनेत्रींवर बरसली आहे. इतर अभिनेत्रींच्या नजरेत तिचं काहीही अस्तित्व नसल्याचं कंगनानं एका मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Jan 13, 2019 03:44 PM IST

आता बॉलिवूड अभिनेत्रींवर बरसली कंगना, म्हणाली...

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री कंगना रनौतच्या अभिनयाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कंगना तिच्या प्रत्येक भूमिकेकडे विशेष लक्ष देते हे तिच्या प्रत्येक सिनेमातून आतापर्यंत दिसलंच आहे. नेहमीच बॉलिवूडकरांवर नाराज असलेल्या कंगनाने यावेळी बॉलिवूडमधील इतर अभिनेंत्रीवर निशाणा साधला आहे.

एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीमध्ये कंगना म्हणाली की, 'मी बॉलिवूडमधील सर्व अभिनेंत्रींचं आवर्जुन कौतुक करते आणि सर्वांना समान मानते. आलिया भट्ट असो किंवा अनुष्का शर्मा... मला त्यांचं काम आवडलं तर मी त्यांच्या कामाचं कौतुक करतेच.’

पुढे कंगना म्हणाली की, ‘दीपिकाचा ‘पिकू’ चित्रपट पाहिला आणि त्याबद्दल मी तिचं कौतुक केलं होतं. मी माझ्या पद्धतीनं प्रत्येकाचं कौतुक करत असते. सोनाक्षी सिन्हाचा ‘लुटेरा’ चित्रपट मला फार आवडला होता आणि मी त्याविषयीही तिचं अभिनंदन केलं होतं.’

Loading...

एवढं बोलून कंगना थांबली नाही. ती पुढे म्हणाली की, ‘बॉलिवूडमधील या अभिनेत्रींना कधीही माझं कौतुक करावं असं वाटत नाही. माझ्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. असं असताना या अभिनेत्री नेहमीच मला दुर्लक्षित का करतात? असा प्रश्न अनेकदा मनात येतो.’

कंगना रनौतने ‘मणिकर्णिका’ चित्रपटाविषयी बोलताना सांगितलं की, ‘मणिकर्णिका चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत. चित्रपटाचा ट्रेलर लोकांना आवडला. आतापर्यंत यशस्वी काम करुन देखील माझं काही अस्तित्व नाही असं इतर अभिनेत्रींकडून मानलं जातं आणि माझ्या सिनेमाला किंवा माझ्या कामाला दुर्लक्षित केलं जातं.’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 13, 2019 03:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...