मुंबई, 24 मार्च : बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत अभिनय कौशल्यासोबतच आपल्या भिडस्त स्वभावासाठी ओळखली जाते. कोणत्याही विषयावर स्पष्टपणे बोलणारी कंगना अनेकदा वादाची शिकार होते. मणिकर्णिका सिनेमाला बॉलिवूडकरांकडून पाठिंबा मिळाला नसल्यानं नाराज कंगणानं प्रत्येक ठिकाणी आपला राग मीडियासमोर व्यक्त केला. भारताकडून सिनेसृष्टीला दिला जाणारा सर्वात मोठा पुरस्कार 'नॅशनल अवॉर्ड'बाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे कंगना आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कोणत्या ना कोणत्या कारणाने वादात असणाऱ्या कंगनानं आता नॅशनल अवॉर्डवरच प्रश्न उपस्थित केला आहे.
आतापर्यंत वेगवेगळ्या सिनेमांसाठी चार वेळा नॅशनल अवॉर्ड मिळालेल्या कंगनानं तिच्या वाढदिवसादिवशी प्रसारमाध्यामांशी संवाद साधला. यावेळी तिचा सिनेमा 'मणिकर्णिका'ला नॅशनल अवार्ड मिळावा अशी इच्छा तिनं व्यक्त केली. तसेच जर 'मणिकर्मिका'ला नॅशनल अवॉर्ड मिळाला नाही तर या अवॉर्डच्याच विश्वसनियतेवर प्रश्न उपस्थित होतील असं वक्तव्यही कंगनानं केलं. या राष्ट्रीय सन्मानासाठी 'मणिकर्णिका' व्यतिरिक्त दुसरा कोणताच योग्य सिनेमा नाही असंही तिनं यावेळी म्हटलं.
कंगना प्रसारमाध्यमांशी बोलताना पुढे म्हणाली, 'काहीवेळा असं होतं की एखादी व्यक्ती त्याच्या कलेमुळे, परफॉर्मेंसमुळे किंवा सिनेमामुळे एवढा उत्कृष्ट होतो की, त्याचा योग्य सन्मान न केल्यास पुरस्कार देणाऱ्या संस्थेचा तो अपमान असतो. जर माझा चित्रपट 'मणिकर्णिका'ला नॅशनल अवॉर्ड मिळाला नाही तर तर त्या पुरस्काराच्या विश्वसनियतेवर प्रश्न उपस्थित होईल.'
सध्या कंगना तिच्या आगामी सिनेमाबाबत खूप चर्चेत आहे. दिवंगत राजकीय नेत्या जयललिता यांच्या बायोपिकसाठी कंगनाला कास्ट केलं गेल्याच्या चर्चा आहेत. असं झाल्यास कंगनाच्या सिनेकरिअरमधील हा सर्वात मोठा सिनेमा ठरेल. हा सिनेमा तमिळ आणि हिंदी असा दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
पाहा : Video : आलिया भटनं सर्वांसमोर दिली प्रेमाची कबुली, 'अशी' होती बॉयफ्रेंड रणबीरची प्रतिक्रिया
वाचा : 'हे' बॉलिवूड सेलिब्रिटी आहेत ब्रँडेड घड्याळांचे शौकीन, किंमत ऐकून व्हाल थक्क
वाचा : Filmfare Awards 2019: रेड कार्पेटवर बॉलिवूड सिताऱ्यांचा ग्लॅमरस अंदाज