Elec-widget

जयललितांचा बायोपिक स्वीकारल्याचं कंगनाने सांगितलं 'हे' कारण

जयललितांचा बायोपिक स्वीकारल्याचं कंगनाने सांगितलं 'हे' कारण

तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या बायोपिकबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना कंगनाने हा सिनेमा तिनं का स्वीकारला याचा खुलासा केला.

  • Share this:

मुंबई, 25 मार्च : बॉलिवूड क्वीन कंगना रनौतनं मणिकर्णिका नंतर आता आणखी एक बायोपिक साइन केला आहे. कंगना लवकरच एकेकाळच्या तमिळ अभिनेत्री आणि तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात कंगना जयललितांची व्यक्तिरेखा साकारणार असून या सिनेमासाठी तिनं तब्बल 24 कोटी रुपये एवढं मानधन घेतल्याची चर्चा आहे. त्यानंतर 'तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या आणि माझ्या आयुष्यातील काही घटना सारख्याच आहेत' असं वक्तव्य कंगनानं केलं आहे.

जयललिता यांच्या जीवनावर आधारित हा बायोपिक तेलगू आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाविषयी प्रसारमाध्यमांशी बोलताना कंगनाने हा सिनेमा तिनं का स्वीकारला याचा खुलासा केला. ती म्हणाली, 'ज्या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचता येईल अशा चित्रपटात मला कायम काम करायचं होतं. या क्षेत्रात पदार्पण केल्यापासून माझ्या डोक्यात सतत हाच विचार होता. त्यानंतर तमिळनाडू आंध्रप्रदेश या ठिकाणी फिरताना इथल्या लोकांना थेट मनाला भिडणारे सिनेमे जास्त आवडतात ही गोष्ट मला प्रकर्षानं जाणवली. अशातच माझ्याकडे जयललितांच्या बायोपिकची ऑफर आली आणि मी ती स्वीकारली.'

कंगना पुढे सांगते, ''जयललितांची कथा वाचताना मला जाणवलं की त्यांच्या आणि माझ्या आयुष्यात बरचं साम्य आहे. त्यामुळे ही कथा मनाला भावली. अगोदर मी माझ्या जीवनावर आधारित बायपिकची निर्मिती करण्याच्या तयारीत होते मात्र जयललितांच्या बायोपिकची ऑफर आल्यावर मी त्याचा नीट अभ्यास केला. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की जयललिता आणि माझ्या जीवनात अनेक गोष्टी समान आहेत. अगदी थोड्या काळासाठी माझ्या आयुष्यात जसं नैराश्य आलं तसं त्यांच्याही आलं होतं. आमच्या दोघींच्या आयुष्यात असलेलं अनेक गोष्टीतील साम्य पाहिल्यावर मी हा सिनेमा करण्याचा निर्णय घेतला.''

दाक्षिणात्य दिग्दर्शक विजय हे जयललिता यांच्या जीवनावर आधारित बायोपिकचं दिग्दर्शन करणार आहेत. या सिनेमातून जयललिता यांच्या जीवनातील चढउतार, त्यांची राजकीय कारकिर्द या सर्व गोष्टीचा उलगडा करण्यात येणार आहे. जयललिता यांचा बायोपिक हिंदी, तामिळ या दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून  हिंदीत 'जया' तर तेलुगुमध्ये 'थलावयी' असं या बायोपिकचं नाव असणार आहे.

VIDEO : 'पाकिस्तानने आपले 40 अतिरेकी मारले', दानवेंची पुन्हा घसरली जीभ


Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 25, 2019 05:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...