VIDEO: भावाच्या लग्नात राजकुमारीसारखी सजली कंगना; क्वीनचे ठुमके बघून नेटकरी घायाळ

VIDEO: भावाच्या लग्नात राजकुमारीसारखी सजली कंगना; क्वीनचे ठुमके बघून नेटकरी घायाळ

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) ने तिच्या भावाच्या लग्नात जबरदस्त डान्स केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 11 नोव्हेंबर: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) आजकाल तिच्या चित्रपटांपेक्षा जास्त तिच्या टीट्स आणि भांडणांमुळे चर्चेत असते. पण सध्या कंगना तिच्या भावाच्या लग्नामध्ये व्यस्त आहे. कंगनाच्या दोन भावांची लग्न आहेत. तिच्या भावाच्या मेहंदी सेरिमनीमध्ये तिने गोल्डल रंगाचा सिल्कचा सुंदर ड्रेस घातला होता. लग्नाच्या वेळी कंगनाने जबरदस्त डान्सही केला. तिच्या डान्सचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

कंगनाच्या ऑफिशिअल इंस्टाग्राम अकाऊंटवर हा तिने भावाच्या मेहंदी सेरिमनीचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. गोल्डन ड्रेस आणि गोल्डन नेकलेस यामुळे कंगना एकदम क्लासी दिसत आहे. तिने फोटो शेअर केल्यावर तिच्या अनेक फॅन्सनी तिच्या रुपाचे भरपूर कौतुक केलं आहे.

View this post on Instagram

Kangana at Mehandi ceremony. The vibes ✨✨✨

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut) on

कंगना आणि तिची बहीण रंगोली तिच्या भावांच्या हातावर मेहंदी काढत आहेत असा फोटो तिने शेअर केला आहे. या फोटोमध्ये कंगनाचा भाऊ अक्षत आणि त्याची होणारी बायकोसुद्धा दिसत आहे.

कंगनाने शेअर केलेल्या डान्सचा व्हिडीओ सुपरहिट झाला आहे. मुंबई पोलिसांनी कंगना आणि तिच्या बहिणीला 10 नोव्हेंबर रोजी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण भावाच्या लग्नात व्यस्त असल्याचं कारण देत तिने मुंबईला जाण्याचं टाळलं आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: November 11, 2020, 10:30 PM IST

ताज्या बातम्या