Home /News /entertainment /

'...तर मीही आत्महत्या केली असती', सुशांत प्रकरणानंतर कंगना रणौतनं केला खुलासा

'...तर मीही आत्महत्या केली असती', सुशांत प्रकरणानंतर कंगना रणौतनं केला खुलासा

याआधी अभिनेत्री कंगना रणौतनं सुशांतच्या आत्महत्येनंतर एक व्हिडीओ पोस्ट करत बॉलिवूडवर आरोप केले होते. आता कंगनानं एक धक्कादायक खुलासा केला आहे.

  मुंबई, 19 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर (sushant singh rajput death) बॉलिवूडमध्ये विविध चर्चा केल्या जात आहेत. सुशांतच्या आत्महत्येला आत्महत्येला नेपोटिझम आणि बॉलिवूडकर जबाबदार असल्याचे काहींची म्हणणे आहे. याआधी अभिनेत्री कंगना रणौतनं सुशांतच्या आत्महत्येनंतर एक व्हिडीओ पोस्ट करत बॉलिवूडवर आरोप केले होते. आता कंगनानं एक धक्कादायक खुलासा केला आहे. कंगणानं सुशांतसोबत जे काही घडलं ते आपल्यासोबतही याआधी घडल्याचं सांगितलं आहे. कंगनानं सांगितले की, "सुशांतसोबत जे काही झालं त्यात नवीन काही नाही आहे. आज महेश भट यांनी सुशांतच्या नैराश्येची तुलना परवीन बाबी यांच्यासोबत केली. माझ्यावरही एकेकाळी अशीच वेळ आली होती". कंगणानं यावेळी एक धक्कादायक खुलासाही केला. ती म्हणाली की, "पहिल्यांदा आणि अखेरचं जावेद अख्तर यांनी मला त्यांच्या घरी बोलवलं. तेव्हा त्यांनी समाजवलं आणि सांगितलं की, जर मी राकेश रोशन यांची माफी नाही मागितली तर मला मोठं नुकसान सहन करावं लागले. एवढेच नाही तर, जावेद अख्तर यांनी कंगनाला संपूर्ण रोशन कुटुंबाची माफी मागण्यास सांगितले होती, असेही अभिनेत्रीनं सांगितलं. वाचा-'बात तो कर लेता यार', सुशांतच्या आठवणीत मित्र महेश शेट्टीची भावुक पोस्ट याआधी व्हिडीओ पोस्ट करत केली बॉलिवूडवर टीका सुशांतच्या आत्महत्येनंतर कंगनाच्या टीमनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात ती सांगते, सुशांतच्या जाण्यानं सर्वांना धक्का बसला आहे. पण काही लोकांना त्याच्या आत्महत्येचा वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला आहे. ते असं सांगत आहेत की, त्याची मानसिक स्थिती ठिक नव्हती. जो व्यक्ती रँक होल्डर आहे त्याची मानसिक स्थिती कशी बिघडते. त्याच्या मागच्या काही मुलाखती पाहा पोस्ट पाहा ज्यात त्यांनी लोकांना अपील केलं आहे त्याचे सिनेमा पाहण्यासाठी त्यानं हे सुद्धा सांगितलं होतं की, माझे सिनेमा पाहा नाही तर मला या इंडस्ट्रीमधून बाहेर काढलं जाईल.
  वाचा-'सुशांत नाही तर मी केली असती आत्महत्या', आणखी एका अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा कंगनाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. कंगना नेहमीच बॉलिवूडमधल्या नेपोटिझमबद्दल बोलत आली आहे. अनेकदा यावरून वादही झाले आहे. छिछोरे नंतर सुशांतकडे 7 सिनेमा होते मात्र ते सिनेमा एक-एक करून त्याच्या हातून निसटले. त्यामुळे तो सुद्धा नेपोटिझमची शिकार झाल्याचं बोललं जात आहे. वाचा-सुशांतच्या निधनाचं दु:ख पचवणं अवघड; त्याच्या लाडक्या कुत्र्यानेही जेवण सोडलं
  Published by:Priyanka Gawde
  First published:

  Tags: Kangana ranaut, Sushant Singh Rajput

  पुढील बातम्या