मुंबई, 18 ऑगस्ट : अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) आतापर्यंत दिग्दर्शक करण जोहरवर (karan johar) निशाणा साधतच आली आहे. आतादेखील पुन्हा ती त्याच्यावर भडकली आहे आणि याला कारण ठरलं ते सुशांतचा मृत्यू आणि आता नुकताच रिलीज झालेला गुंजन सक्सेना चित्रपट. फिल्मची मोडतोड करून असा देशद्रोही चित्रपट बनवणाऱ्या करणचा पद्मश्री (PadmaShri) काढून घ्यावा, अशी मागणी तिनं केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून गुंजन सक्सेना चित्रपटावरून वाद निर्माण होत आहे. गुंजन सक्सेना फिल्ममध्ये वास्तव घटना मोडूनतोडून दाखवण्यात आल्याचं सांगितलं जातं आहे आणि आता याच चित्रपटावरून कंगनाने करणला पुन्हा लक्ष्य केलं आहे. करणने या फिल्मची निर्मिती केली आहे.
I request government of India to take KJO’s PadmaShri back,he openly intimidated me and asked me to leave the industry on an international platform,conspired to sabotage Sushanth’s career,he supported Pakistan during Uri battle and now antinational film against our Army. https://t.co/KEgVEDpMrF
— Kangana Ranaut (@KanganaTeam) August 18, 2020
कंगना रणौतच्या टिमने ट्वीट केलं आहे. कंगना म्हणाली, "करण जोहरचा पद्मश्री पुरस्कार काढून घ्यावा, अशी विनंती मी भारत सरकारला करते. त्याने एका आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर बोलताना मी ही इंडस्ट्री सोडून जाण्याबाबत भाष्य केलं होतं. त्याने सुशांतचं करिअर संपवलं, उरी हल्ल्यावेळीही त्याने पाकिस्तानला पाठिंबा दिला होता आणि आता आपल्या भारतीय सैन्याबाबत देशद्रोही फिल्म बनवली आहे"
हे वाचा - प्रत्येक डॉक्टरने एक रुग्ण दत्तक घेतल्यास देशाचं चित्र बदलेल, सोनू सूदला विश्वास
गुंजन सक्सेना हा चित्रपट वादात आहे. आपलं नकारात्मक चित्रण केल्याप्रकरणी भारतीय हवाईदलाने यावर नाराजी व्यक्त केली होती. तसंच गुंजन सक्सेना यांच्यासोबत भारतीय हवाई दलात प्रशिक्षण घेतलेल्या श्रीविद्या राजन यांनीही या फिल्मवर आक्षेप घेतला. कारगिलवेळी विमान उडवण्यात आपण दोघीही होतो फक्त गुंजन नाही, असा दावा त्यांनी केला आहे. शिवाय चित्रपटात पंजा लढवण्याचा सीन दाखवण्यात आला आहे, तसं काहीच झालं नव्हतं असंही त्या म्हणाल्या. गुंजन सक्सेना फिल्ममध्ये वास्तव घटना मोडूनतोडून दाखवण्यात आल्याचं श्रीविद्याचं यांनी म्हटलं आहे. त्यांनी आपल्या फेसबुकवर याबाबत पोस्ट केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kangana ranaut, Karan Johar