मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /एकीकडे कौतुक दुसरीकडे बॉलिवूडवर वार! सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाबद्दल कंगना म्हणाली...

एकीकडे कौतुक दुसरीकडे बॉलिवूडवर वार! सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाबद्दल कंगना म्हणाली...

kangana

kangana

अभिनेत्री कंगना राणौतनं देखील शुभेच्छा दिल्या आहेत. दोघांना ट्रोल करणाऱ्यांना कंगनानं उत्तर दिलंय.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई,  08 फेब्रुवारी : अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी काल जैसलमेरमध्ये लग्नगाठ बांधली. बॉलिवूडच्या बहुचर्चित कपलचं शुभमंगल अखेर 07 फेब्रुवारीला पार पडलं. सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाला बॉलिवूडची दिग्गज मंडळी उपस्थित होती. दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल अनेक वर्ष कुठेही कोणतंही वक्तव्य केलं नव्हतं. अनेकदा त्यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. अनेकदा त्यांच्या नात्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले. मात्र दोघांनी त्यांच्या नात्याची माहिती कधीच दिली नाही. पण फॅन्स मात्र दोघांचं नातं ओळखून होते. दोघांनी थेट त्यांच्या लग्नाची बातमी चाहत्यांनी दिली. दोघांना बॉलिवूड तसेच त्यांच्या चाहत्यांकडून शुभेच्छा येत आहेत. दरम्यान दोघांना अभिनेत्री कंगना राणौतनं देखील शुभेच्छा दिल्या आहेत. एकीकडे शुभेच्छा तर दुसरीकडे कंगनानं बॉलिवूडवर निशाणा साधला आहे.

राइटर असलेल्या अनिरुद्ध गुहा यांनी सिद्धार्थ-कियाराचा फोटो ट्विट करत 'हे दोघे डेट करत होते?', असा प्रश्न केला. त्यांच्या या ट्विटला उत्तर देत कंगनानं बॉलिवूडवर चांगलाच निशाणा साधला आणि दुसरीकडे सिद्धार्थ-कियाराला शुभेच्छा दिल्यात. कंगनानं म्हटलंय, 'हो ते डेटिंग करत होते. पण ब्रँड्स आणि सिनेमाच्या प्रमोशनसाठी नाही'.

हेही वाचा - कियारा ते आलिया; बॉलिवूडमध्ये आलाय सूर्यास्तावेळी लग्न करण्याचा ट्रेंड, कारण आहे खूपच खास

कंगनानं पुढे म्हटलंय, 'कोणत्याही अटेंशनसाठी असलेली बॉली रिलेशनशिप त्यांनी केली नाही. लाइमलाइटमध्ये येण्यासाठी कोणताही दिखावा केला नाही. त्यांचं नातं खूपच पवित्र आणि खरं आहे. खूप गोड कपल आहे'. कंगनानं या ट्विटमधून दोघांचं कौतुक केलंच मात्र तिनं पुन्हा एकदा आलिया आणि रणबीर कपूरवर निशाणा साधला आहे.

सिद्धार्थ आणि कियारा यांचं 7 फेब्रुवारीला लग्न झालं. जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये दोघांचा शाही विवाह झाला. दोघेही अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. दोघांनी शेरशाह सिनेमात एकत्र काम केलंय. सिनेमातील त्यांना ऑनस्क्रिन केमिस्ट्री पाहून सगळ्यांनाच त्यांची जोडी आवडली होती.   दोघांच्या रिलेशनच्या खूप चर्चा होत्या. त्यांना पहिल्यांदा सलमान खानला त्यांच्या लग्नाची हिंट दिली होती. पण दोघांच्या लग्नाला सलमान खान पोहोचू शकला नाही.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News