मुंबई, 11 जुलै : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि तिची बहीण रंगोल चंडेल यांना संपूर्ण मीडियाला अपशब्द वापरून त्यांच्याशी पंगा घेणं भारी पडणार आहे. या सर्व प्रकरणानंतर Judgmental Hai Kya या कंगनाच्या आगामी सिनेमाला कोणत्याही प्रकारचं कव्हरेज न देण्याचा निर्णय Entertainment Journalist’s Guild of India घेतला होता. तसं पत्र लिहून या संस्थेनं कंगनाचा हा सिनेमा पूर्णपणे बॉयकॉट करत असल्याचं सिनेमाची निर्माती एकता कपूरला कळवलं होतं. ज्यानंतर एकतानं या सर्व प्रकाराची माफी मागितली होती. मात्र कंगना मात्र तिचा मुद्दा सोडायला तयार नाही. कंगनाची बहीण रंगोलीन तिच्या ट्विटर वरून मीडियासाठी अपशब्द वापरल्यानंतर आता कंगनानं रंगोलीच्या ट्विटर अकाउंटवरून या प्रकरणीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
या पत्रकार वादानंतर कंगनानं त्या पत्रकाराची माफी मागावी अशी मागणी करण्यात येत होती मात्र कंगानानं असं काहीही न करता उलट तिची बहीणी रंगोली चंडेलच्या ट्विटर अकाउंटवरून व्हिडिओ शेअर करत पुन्हा एका पत्रकार आणि मीडियाला अपशब्द वापरता विकावू, देशद्रोही आणि चींधी पत्रकार आहेत असं म्हटलं आहे. तसेच ज्या संस्थेनं कंगनाच्या विरोधात बॉयकॉट करण्याविषयीचं पत्र लिहिलं होतं ती संस्था सुद्धा अधिकृत नसल्याचा आरोप केला आहे. तसेच पत्रकार आणि मीडियाच्या विरोधात अनेक अपमानकारक गोष्टी बोलल्या आहेत.
बिग बी नंतर हा अभिनेता ठरला असता सुपरस्टार; 2002 नंतर मिळाली नाही एकही फिल्म
Here’s a vidoe message from Kangana to all the media folks who have banned her, P.S she has got viral fever hence the heavy voice 🙂...(contd) pic.twitter.com/U1vkbgmGyq
Loading...— Rangoli Chandel (@Rangoli_A) July 11, 2019
कंगना नुकतीच तिच्या सिनेमातील गाण्याच्या लॉन्चिंगवेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एका पत्रकारावर भडकली होती आणि तिने त्यावेळी या पत्रकाराला अनेक गोष्टी ऐकवल्या होत्या. हे सर्व एवढ्यावरच थांबलं नाही तर सोशल मीडियावर तिच्या बहीणीनं मीडियाबद्दल अनेक उलसुलट गोष्टी लिहिल्या. त्यामुळे आता Entertainment Journalist’s Guild of India या संस्थेनं ‘जजमेंटल है क्या’ या सिनेमाची प्रोड्युसर एकता कपूर हिला एक पत्र लिहिलं होतं. ज्या कंगनाचा हा सिनेमा पूर्णपणे बॉयकॉट करण्यात येणार असून या सिनेमाला कोणत्याही प्रकारचं कव्हरेज देण्यात येणार नसल्याचं म्हटलं होतं. यानंतर एकतानं सर्वांची माफी मागितली आहे. पण कंगनानं मात्र अशाप्रकारचा व्हिडिओ शेअर करत माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
‘तारक मेहता…’ फेम मुनमुन दत्ताला ट्रेकदरम्यान आला पॅनिक अटॅक, शेअर केला जीवघेणा
(Contd)....🙏🏻🙏🏻🙏🏻 pic.twitter.com/nzQoVN8llU
— Rangoli Chandel (@Rangoli_A) July 11, 2019
काय आहे संपूर्ण प्रकरण
‘जजमेंटल है क्या’ मधील नवीन गाण्याच्या लॉन्चवेळी कंगनाचा एका पत्रकाराशी जोरदार वाद झाला होता. एकता कपूर, कंगना रणौत आणि राजकुमार राव त्यांच्या आगामी जजमेंटल है क्या सिनेमातील एका रीमिक्स प्रमोशनल गाण्याच्या लॉन्चला पोहोचले होते. पत्रकार परिषद सुरू असताना जस्टिन राव या पत्रकाराने आपलं नाव सांगून प्रश्न विचारायला सुरुवात केली, तेव्हा कंगनाला जस्टिनशी निगडीत एक जुनी गोष्ट कंगनाला आठवली. मणिकर्णिका या तिच्या सिनेमाशी निगडीत जस्टिनने एक बातमी तिच्याविरुद्ध छापली होती. मग काय कंगनाने मागचा पुढचा विचार न करता जस्टिनला सर्वांसमोर सुनवायला सुरुवात केली.
कंगनाच्या या वादामुळे पत्रकार परिषदेला एक वेगळंच वळण आलं. जस्टिन रावच्या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी कंगनाने त्याच्यावरच अनेक आरोप केले. जस्टिनने मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी सिनेमाबद्दल पूर्वग्रह मनात ठेवून नकारात्मक लिहिले. तसेच तिच्याबद्दलही अनेक चुकीच्या गोष्टी लिहिल्या.
'माणूस अनेकांच्या प्रेमात पडू शकतो' बोल्ड राधिका आपटेची बेधडक मुलाखत
यावर जस्टिन म्हणाला की, 'कंगना तू माझ्यावर असे आरोप करू शकत नाही. मी जे काही लिहितो ते खरं लिहितो. तसेच मी तुझ्याबद्दल कधीही चुकीचं लिहिलेलं नाही.' जस्टीनने अनेकदा आपलं म्हणण मांडलं तरी कंगना त्याच्यावर ओरडण्याची काही थांबली नाही. एवढ्यावरच हे प्रकरण थांबलं नाही तर मणिकर्णिका सिनेमाशी संबंधीत मुलाखतीसाठी हा पत्रकार व्हॅनिटी वॅनमध्ये तीन तास थांबला होता आणि त्याने अनेकदा पर्सनल मेसेजही केले. या सर्व वादात जस्टिन अगदी शांतपणे आणि सन्मानाने एकच गोष्ट वारंवार सांगत होता की त्याने कधीही कंगनासोबत लंच केला नाही. तसेच तो तिच्या व्हॅनिटी वॅनमध्येही गेला नाही. पण कंगना त्याचं काही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हती.
यानंतर सर्व स्तरातून कंगनानं त्या पत्रकाराची माफी मागावी अशी मागणी होऊ लागली तसेच तिच्यावर खूप टीकाही झाली. यावर शांत बसेल ती कंगनाची बहीण कसली. तिनं सुद्धा तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून मीडियासाठी अनेक अपशब्दाचा वापर करत कंगना कोणत्याही प्रकारची माफी मागणार नाही उलट तुम्हाला पकडून पकडून मारेल. तुम्ही चुकीच्या व्यक्तीकडून माफीची मागणी केली आहे असं बरंच काही लिहिलं.
===================================================================
VIDEO: आषाढी एकादशीनिमित्त पंढरी सजली
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा