Home /News /entertainment /

ठाकरे सरकार कोसळताच कंगना आली समोर, VIDEO शेअर करत म्हणाली...

ठाकरे सरकार कोसळताच कंगना आली समोर, VIDEO शेअर करत म्हणाली...

उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा आणि विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. याविषयी कंगनानं एक व्हिडीओ शेअर करत आपलं मत मांडलं आहे.

  मुंबई, 30 जून : बाॅलिवूडची पंगा क्वीन म्हणजेच अभिनेत्री कंगना रणौत (Kangana ranaut)नेहमीच आलं परखड मत मांडत असते. राज्यातील प्रत्येक मुद्द्यावर ती आपलं मत व्यक्त करत असते. अशातच राज्यातील राजकीय वातावरण (Political crisis)जोरदार पेटलेलं असताना कंगना यावर काही प्रतिक्रिया देणार नाही असं कधी होईल का?. राज्यातील सुरु असणाऱ्या सत्तानाट्यावर कंगनानं आपलं मत मांडलं आहे. बुधवारी उशिरा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा आणि विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. या संदर्भात कंगनानं एक व्हिडीओ शेअर करत आपलं मत मांडलं आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर कंगनानं इन्स्टाग्रामवर(kangana instagram post) व्हिडीओ शअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कंगनानं शिवसेना, उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.  'जेव्हा पाप वाढते, तेव्हा विनाश होतो आणि त्यानंतर सृजन होते... आणि जीवनाचे कमळ फुलते.', अशा कॅप्शनसह कंगनानं हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 1975 नंतर हा काळ भारताच्या लोकशाहीसाठी सर्वात महत्त्वाचा काळ आहे. 1975 मध्ये लोकनेते जयप्रकाश नारायण यांच्या हाकेने लोक येतील आणि सिंहासन पडले. 2020 मध्ये मी म्हणाले होते की लोकशाही ही एक श्रद्धा आहे आणि जो सत्तेच्या अभिमानाने हा विश्वास तोडतो त्याचा अभिमानही तुटतो. ती कोणत्याही विशिष्ट व्यक्तीची शक्ती नाही. हीच खऱ्या चारित्र्याची ताकद आहे, असं कंगनानं व्हिडीओमध्ये म्हटलंय. हेही वाचा - 'सावरकरांचा अपमान सहन करणार नाही', स्वरा भास्करला जीवे मारण्याची धमकी
  कंगना पुढे म्हणाली की,  'हनुमानजींना शिवाचा 12वा अवतार मानलं जातं आणि जेव्हा शिवसेनेनं हनुमान चालिसावर बंदी घातली. तेव्हा शिवदेखील शिवसेनाला वाचवू नाही शकत. हर हर महादेव, जय महाराष्ट्र'. कंगनानं शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. दरम्यान,  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा (uddhav thackeray resigns as cm) दिल्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. आता फडणवीस आणि एकनाथ शिंदे सरकार (devendra fadanvis) स्थापन होणार आहे. त्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे हे गोव्याहून मुंबईकडे निघाले आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आज दुपारी 3.30 वाजता राजभवनावर जाणार आहे. यावेळी फडणवीस आणि शिंदे सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे.
  Published by:Sayali Zarad
  First published:

  Tags: Entertainment, Kangana ranaut, Politics

  पुढील बातम्या