Home /News /entertainment /

Nawazuddin च्या मुंबईतील नव्या बंगल्याबाबत कंगना रणौतने दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाली...

Nawazuddin च्या मुंबईतील नव्या बंगल्याबाबत कंगना रणौतने दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाली...

नवाझुद्दीनचं हे नवं घर म्हणजे भव्य राजवाडा आहे. नुकतेच या घराचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौततने (Kangana Ranaut) या घराचं आणि नवाझुद्दीनचं विशेष कौतुक केलं आहे.

मुंबई, 29 जानेवारी: वैशिष्टयपूर्ण अभिनयशैलीमुळे बॉलिवूड अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) नेहमीच चर्चेत असतो. चित्रपटातील त्याची भूमिका खलनायकी असो अथवा नायकाची तो ती तितक्याच ताकदीनं साकारतो. चित्रपटसृष्टीत कामं मिळवण्यासाठी आणि स्थिरावण्यासाठी नवाझुद्दीनला खूप स्ट्रगल करावं लागलं. परंतु, टॅलेंटच्या जोरावर त्यानं यश मिळवलं. एक यशस्वी अभिनेता असून देखील तो स्वतःला स्टार समजत नाही, हे त्याच्या स्वभावाचं वेगळेपण ठरतं. खासगी आयुष्यातील एका महत्त्वाच्या गोष्टीमुळे नवाझुद्दीन सध्या जोरदार चर्चेत आहे. नवाझुद्दीनचं मुंबईत घराचं (Nawazuddin Siddiqui New House in Mumbai) स्वप्न साकार झालं आहे. नवाझुद्दीनचं हे नवं घर म्हणजे भव्य राजवाडा आहे. नुकतेच या घराचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत. नवाझुद्दीनचं हे यश त्याच्या अपार मेहनतीचं फळ आहे, अशी प्रतिक्रिया त्याचे फॅन्स व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौततने (Kangana Ranaut) या घराचं आणि नवाझुद्दीनचं विशेष कौतुक केलं आहे. हे वाचा-लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत 'हा' Hero' अव्वल, पाहा LIST अभिनेता नवाझुद्दिन सिद्दीकीने मुंबईत नवं घर बांधलं आहे. अत्यंत वैशिष्टयपूर्ण आणि भव्य अशा या बंगल्याचे फोटोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नवाझुद्दीनने त्याच्या वडिलांच्या नावावरून या बंगल्याचे नाव 'नवाब' असं ठेवलं आहे. 'डीएनए'च्या वृत्तानुसार, या अभिनेत्याने पांढऱ्या रंगाच्या भव्य अशा राजवाड्याचे नूतनीकरण करण्यासाठी जवळपास तीन वर्षं घालवली. उत्तर प्रदेशातील बुढाना येथील त्याच्या मूळ घरापासून त्याने प्रेरणा घेत या नव्या बंगल्याचे नूतनीकरण केले आहे. या बंगल्यामुळे नवाझुद्दीन त्याचं स्वप्न आज प्रत्यक्षात जगत आहे. मात्र हे यश त्याला सहजासहजी नक्कीच मिळालेलं नाही. बॉलिवूडमध्ये (Bollywood) यश मिळवण्यासाठी त्याला खूप स्ट्रगल करावं लागलं. कठोर मेहनत आणि टॅलेंटच्या जोरावर नवाझुद्दिन यशस्वी झाला आहे. त्यामुळे हे यश त्याच्या मेहनतीचं फळ आहे, अशी प्रतिक्रिया त्याच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे. हे वाचा-सुपरस्टार Akshay Kumar झळकणार 'या' दाक्षिणात्य सुपरहिट सिनेमाच्या रिमेकमध्ये नवाझच्या सुंदर आणि भव्य बंगल्याचे फोटोज पाहून बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतही प्रभावित झाली आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर (Kangana Ranaut Instagram Story) नवाझच्या अलिशान बंगल्याचा फोटो शेअर केला आहे. यात कंगना लिहिते की 'नवाझुद्दीन सिद्दीकी सरांनी त्यांच्या नव्या घराचं डिझाईन स्वतः केलं आहे. ते खूपच सुंदर आहे. खूप...खूप... शुभेच्छा'. कंगना लवकरच नवाझसह काम करताना दिसणार आहे. नवाझुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'टिकू वेड्स शेरू' या चित्रपटाद्वारे कंगना डिजिटल माध्यमात निर्माती (Producer) म्हणून पदार्पण करत आहे. नवाझुद्दीन सिद्दीकी आज बॉलिवूडमधला मोठा स्टार आहे. 'परंतु, मी स्टार नसून अभिनेता आहे. त्यामुळे मला स्टारडम गमवण्याची भिती नाही', असं तो सांगतो. बॉलिवूडमध्ये नाव कमावण्यासाठी घेतलेले कष्ट आणि प्रयत्नांमुळेच आज नवाझुद्दीन खऱ्या अर्थाने अनेकांचे प्रेरणास्थान ठरला आहे.
First published:

Tags: Kangana ranaut

पुढील बातम्या