Home /News /entertainment /

'युद्ध केवळ सैन्याचे होत नाही तर...', #BoycottChineseProduct च्या अभियानात आता कंगनाची उडी

'युद्ध केवळ सैन्याचे होत नाही तर...', #BoycottChineseProduct च्या अभियानात आता कंगनाची उडी

गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीनंतर अभिनेत्री कंगना रणौतने देखील #BoycottChineseProduct या अभियानात उडी घेतली आहे.

    मुंबई, 27 जून : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) विविध मुद्द्यांवर बेधडकपणे मत मांडण्यासाठी ओळखली जाते. सामाजिक आणि  राजकीय मुद्द्याला हात घालणाऱ्या कंगनाने अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर (Actor Sushant Singh Rajput Suicide) बॉलिवूडमधील नेपोटिझमचा मुद्दा उचलून धरत एका नवीन वादाला तोंड फोडले होते. त्यानंतर आता कंगनाने भारत-चीन संघर्षाबाबत तिचे विचार मांडले आहेत. कंगनाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत तिचे मत मांडले आहे. गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीनंतर अभिनेत्री कंगना रणौतने देखील #BoycottChineseProduct या अभियानात उडी घेतली आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत भारतीयानं चिनी उत्पादनं आणि कंपन्यांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. (हे वाचा-पहिल्यांदा असफल झाल्यावर दुसऱ्या प्रयत्नात सुशांतने घेतला गळफास, पोलिसांना संशय) या व्हिडीओ पोस्ट करताना तिने असं लिहिलं आहे की, 'चीनविरोधात युद्ध लढण्यासाठी आपल्याला एकतेने सामुहिकरित्या उभं राहायला हवे. #अब_चीनी_बंद'.
    या व्हिडीओमध्ये कंगना असं म्हणाली आहे की, 'जर कुणी आपली बोटं कापण्याचा प्रयत्न केला किंवा आपल्या हातापासून तळवा कापण्याचा प्रयत्न केला तेव्हा किती कष्ट होतील? तेवढेच कष्ट चीनने आपल्याला दिले आहेत लडाखवर त्यांची लालची नजर टाकून आणि त्याठिकाणी आपल्या देशाची इंच-इंच सीमा वाचवताना  देशाचे 20 जवान शहीद झाले. काय तुम्ही विसरू शकाल त्यांच्या आईचे अश्रू, त्यांच्या विधवांची किंकाळी आणि मुलांनी दिलेले बलीदान? असा विचार करणे योग्य आहे का की सीमेवर जी लढाई होते ती केवळ सैन्याची असते किंवा सरकारची असते? आपलं त्यामध्ये काहीच योगदान नाही? (हे वाचा-काय आहे सुशांत आणि सिया कक्कर आत्महत्येचं कनेक्शन? कुटुंबीयांची धक्कादायक माहिती) यावेळी कंगनाने गांधीजींच्या स्वदेशी चळवळीची देखील आठवण करून दिली आहे. ती असं म्हणाली आहे की, 'हे जरूरी नाही का की या लढाईमध्ये आपण भाग घेतला पाहिजे? कारण लढाख हा केवळ जमिनीचा तुकडा नाही तर भारताच्या अस्मितेचा प्रश्न आहे.' आपल्या सेनेला आणि सरकारला सहकार्य करण्यची गरज आहे. तसच चिनी सामानावर बहिष्कार टाकून आणि या लढाईत सहभागी होऊन भारताला जिंकवण्याचे आवाहन कंगनाने केले आहे. संपादन - जान्हवी भाटकर
    First published:

    Tags: Kangana

    पुढील बातम्या