Home /News /entertainment /

कंगना रणौतने आता थेट महात्मा गांधींवर साधला निशाणा; चाहते संतापले!

कंगना रणौतने आता थेट महात्मा गांधींवर साधला निशाणा; चाहते संतापले!

राणी एलिजाबेथ यांचं समर्थन करताना तिने महात्मा गांधींवर निशाणा साधला आहे

    मुंबई, 12 मार्च : ब्रिटनचं राजेशाही कुटुंब गेल्या अनेक दिवसांपूर्वी अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी मेघन मार्कल आणि तिचा पती हॅरी यांनी बकिंघम पॅलेसमध्ये वर्णभेदाबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. यादरम्यान आपल्या विधानांमुळे चर्चेत राहणारी कंगना रनौत (Kangana Ranaut ) हिनेदेखील या प्रकरणावर आपलं मत व्यक्त केलं आहे. यावेळी कंगनाने महात्मा गांधी यांच्यावरही धक्कादायक टिप्पणी केली आहे. कंगना सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. अभिनेत्री सोशल मीडियावर आपली भूमिका व्यक्त करीत असते, यानंतर तिच्या पोस्टवर उलट-सुलट प्रतिक्रियाही येत असतात. आता कंगनाने राणी एलिजाबेथ यांच्या समर्थनार्थ ट्वीट केलं आहे. जगावर राज्य करणारी महिला शासक म्हणून एकाचं व्यक्तीचं नाव घेतलं जातं. त्या आदर्श पत्नी वा बहीण होऊ शकल्या नाहीत. मात्र त्या एक महान राणी आहेत. त्यांनी आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम केलं. मुलापेक्षाही मुलगी असूनही त्या पदावर चांगल्या प्रकारे काम केलं. (Kangana Ranaut now directly targets Father of the Nation Mahatma Gandhi ) हे ही वाचा-कंगना रणौतच्या अडचणीत वाढ; मुंबई पोलिसांनी दाखल केली नवी तक्रार जेव्हा एका युजरने कंगनाच्या ट्वीटचं कौतुक केलं, तेव्हा ती म्हणाली की, जग पुरुषांच्या चुका माफ करतं. यानंतर महात्मा गांधींचं नाव घेत ती म्हणाली की, महात्मा गांधींवर त्यांच्या मुलांनी वाईट आई-वडील असल्याचा आरोप केला होता, त्यापैकी अनेक उल्लेखांपैकी एक म्हणजे महात्मा गांधी आपल्या पत्नीला घराबाहेर शौचालयाला जाण्यापासून नकार देण्यासाठी घराबाहेर छक्का देतात. ते एक महान नेता होते, मात्र ते महान पती नव्हते.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Bollywood actress, Kangana ranaut, Mahatma gandhi, Politics, Social media viral, Twitter

    पुढील बातम्या