मुंबई, 02 नोव्हेंबर: अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) सध्या तिच्या मनालीच्या घरामध्ये आराम करत आहे. मुंबईत तिचं घर आणि ऑफिसवर झालेल्या कारवाईनंतर ती मुंबईत फारशी राहायला आली नाही. पण कंगना आपल्या कर्मभूमीची आठवण येत आहे. असं दिसत आहे. कारण तिने मुंबईची एक खास आठवण ट्विटरवरुन शेअर केली आहे.
कंगना रणौतने ट्विटर पोस्ट केलं आहे की, “मुंबईची एक गोष्ट मिस करतेय. ती म्हणजे रेसकोर्सवर घोडेस्वारी करणं. मला खेळांमध्ये फारसा सर कधीच नव्हता पण घोडेस्वारी शिकल्यानंतर मला घोडेस्वारी करणं मनापासून आवडायला लागलं.” कंगनाने घोडेस्वारी करतानाचे काही फोटोदेखील या ट्विटसोबत शेअर केले आहेत. राणी लक्ष्मी बाईंची भूमिका साकारताना कंगनाने ऑन स्क्रीन घोडेस्वारी केली होती.
One thing I miss the most about Mumbai is horse back riding every other morning in race course, I have never been a sports person but I find meditative partnership with my horse, being one with another being is such as exhilarating experience #MondayMotivationpic.twitter.com/nawGCHoSgO
अभिनेत्री कंगना रणौत सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर कंगनाने बॉलिवूडमधल्या घराणेशाही बद्दल आवाज उठवला होता. त्यामुळे बॉलिवूडमधल्या अनेक कलाकांचा आणि निर्मात्यांचा तिने राग ओढवून घेतला. त्यानंतर राज्य सरकारसोबतही कंगनाचे खटके उडाले होते. तिच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेने तोडक कारवाई केली होती. त्यावेळीही तिने ट्विटरवरुन राज्य सरकारवर निशाणा साधला होता. कंगनाने नुकतंच कॅनडाच्या पंतप्रधानांनाही खडसावलं आहे. प्रेषित मोहमंद पैगंबर यांच्या व्यंगचित्राच्या वादावरुन ती ट्विटरवरुन बरसली आहे. "प्रत्येक छोट्या गुन्ह्याची शिक्षा जर शिरच्छेद करणं असेल तर मग कायद्याची गरजच काय?" असा सवाल तिने केला आहे . कंगनाच्या सिनेमांबद्दल बोलायचं झालं तर, नुकतंच कंगनाच्या 'थलायवी' सिनेमाचं शूट पूर्ण झालं आहे. आणि ती सध्या मनालीमध्ये आहे.