मुंबई, 21 जानेवारी: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत स्पष्टवक्ती आहे. तिचे मत ती बिनधास्तपणे मांडते. कंगना तिच्या बेधडक स्वभावासाठी लोकप्रिय आहे. ती प्रत्येक बाबीवर तिचे मत स्पष्टपणे मांडते आणि त्याची चर्चा सुरु होते. कंगनाने पुन्हा एकदा धक्कादायक खुलासा केला आहे. इमर्जन्सी' या येणाऱ्या सिनेमात कंगना इंदिरा गांधींची भूमिका साकारणार असून याचं दिग्दर्शन देखील तिनेच केलं आहे. मध्यंतरी इमर्जन्सीच्या शुटिंगवेळी कंगनाला डेंग्यू झाला होता. तरीही त्या स्थितीत तिने चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं. हे शूटिंग करताना अनेक आज या चित्रपटाचं शूटिंग संपल्यावर कंगनाने एक भावुक पोस्ट शेअर करत शूटिंगदरम्यान आलेल्या अडचणींविषयी धक्कादायक खुलासा केला आहे.
कंगना गेले अनेक दिवस या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारण्याबरोबरच ती निर्मितीची आणि दिग्दर्शनाची धुराही सांभाळत आहे. या चित्रपटाची निर्मिती करणं हे तिच्यासाठी सोपं नव्हतं. हा चित्रपट बनवण्यासाठी तिला स्वतःची मालमत्ता ही गहाण ठेवावी लागल्याचा खुलासा तिने नुकताच केला आहे.
हेही वाचा - Abdu Rozik: बिग बॉसच्या अब्दू रोजिकचं पुणेकरांनी केलं असं स्वागत; फोटो पाहून तुम्हीही म्हणाल क्या बात!
कंगनाने सिनेमाचं शूटिंग संपल्यावर काही BTS फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पोस्ट करताना तिने लिहिलंय कि, 'अभिनेत्री म्हणून आज मी ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं.माझ्या आयुष्यातील एक अतिशय विस्मयकारक टप्पा, तो संपला आहे... दिसताना असं दिसतं की माझा हा प्रवास आरामदायी होता पण सत्य यापेक्षा बरंच वेगळं आहे. माझ्या मालकीची सर्व मालमत्ता गहाण ठेवण्यापासून ते चित्रपटाच्या शूटिंगच्या पहिल्या शेड्युलच्या वेळी डेंग्यूचे निदान होईपर्यंत, शरीरात रक्तपेशींची संख्या कमी असतानाही शूटिंग करेपर्यंत अनेक परीक्षांना मला सामोरं जावं लागलं.”
View this post on Instagram
पुढे ती म्हणाली, 'मी सोशल मीडियावर माझ्या भावना अगदी मोकळेपणाने मांडते, परंतु अशा काही गोष्टी मी कधीही शेअर केलेल्या नाहीत. जे माझी अनावश्यक काळजी करतात, ज्यांना मला अपयशी होताना पाहायचं आहे आणि जे मला त्रास देण्यासाठी प्रयत्न करत होते त्यांना मला माझ्या दुःखाचा आनंद द्यायचा नव्हता.'
ती पुढे म्हणते, 'त्याचप्रमाणे मला तुम्हाला सांगायचं आहे की, तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रमच कामी येतात असं तुम्हाला वाटत असेल तर तसं नाहीये. तुम्ही कठोर परिश्रम घेतलेच पाहिजेत पण तुमच्या क्षमतेबाहेर जर तुमची परीक्षा पाहण्यात येत असेल तर तुम्ही खचून जाऊ नका. प्रयत्न करत राहा. जर तुम्ही खचलात तर तेही सेलिब्रेट करा. कारण तो कालावधी तुमच्या पुनर्जन्माचा कालावधी असतो. हा माझ्यासाठी एक पुनर्जन्मच होता. हे माझ्यासाठी घडवून आणल्याबद्दल माझ्या अत्यंत प्रतिभावान टीमचे मनःपूर्वक आभार.' आता तिची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actress, Bollywood News, Entertainment, Kangana ranaut