News18 Lokmat

‘मणिकर्णिका’मध्ये कंगनाने असा शूट केला युद्धाचा सीन, लोक म्हणाले, डोंगर पोखरून उंदीर काढला

यात कंगना ब्रिटीशांविरुद्ध दोन हात करताना दिसत आहे. हे दृश्य युद्धाचं असलं तरी व्हिडिओ पाहताना तुम्हाला तुमचं हसू आवरणार नाही.

News18 Lokmat | Updated On: Feb 22, 2019 01:57 PM IST

‘मणिकर्णिका’मध्ये कंगनाने असा शूट केला युद्धाचा सीन, लोक म्हणाले, डोंगर पोखरून उंदीर काढला

मुंबई, २२ फेब्रुवारी २०१९- जानेवारी महिन्यात प्रदर्शित झालेला कंगना रणौतच्या मणिकर्णिका सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ठीक- ठाक कमाई केली. सिनेमातील कंगनाच्या कामाचं कौतुक करण्यात आलं. यावेळी सिनेमातील युद्धाच्या सीनची चर्चाही करण्यात आली. सध्या सिनेमातील कंगनाचा युद्धाच्या सीनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात कंगना ब्रिटीशांविरुद्ध दोन हात करताना दिसत आहे. हे दृश्य युद्धाचं असलं तरी व्हिडिओ पाहताना तुम्हाला तुमचं हसू आवरणार नाही. व्हिडिओ नीट पाहिल्यावर कळतं की कंगना एका खोट्या घोड्यावर बसली आहे.हा खोटा घोडा ट्रॉलीवर अर्थात मशीनवर आहे. त्यावर बसून कंगना तलवारबाजी करताना दिसत आहे. घोड्याला पाय आणि शेपटी नाहीये. सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत आहे. यामुळे सध्या कंगना रणौत चांगलीच ट्रोल होत आहे.

एका युझरने लिहिले की, ‘लकडी की काठी, काठी का घोडा’ तर दुसऱ्या युझरने लिहिले की, ‘घोडा छाप,’ एकाहून एक कमेंट तिच्या या व्हिडिओवर पाहायला मिळत आहेत. अजून एका युझरने या व्हिडिओला कमेंट करताना लिहिले की, ‘डोंगर पोखरून निघाली उंदरीण.’ कंगनाल ट्रोल करण्याचं मुख्य कारण म्हणजे मणिकर्णिका सिनेमाच्या प्रमोशनवेळी कंगनाने मुलाखतीत सांगितलं होतं की एक वर्ष ती घोडेस्वारी शिकत होती.

Loading...कंगना म्हणाली होती की, घोडेस्वारी करणं दिसायला जेवढी सोपी आहे तेवढीच ती करायला सर्वात कठीण आहे. एका सीनमध्ये तर माझा जीव जाता जाता वाचला आहे. हा खोटा घोडा क्लोजअप सीनसाठी वापरण्यात आला होता. कंगनाच्या लांबच्या दृश्यात ती खऱ्या घोड्यावर घोडेस्वारी करताना दिसत आहे.

Special Report: पुणेकरांवर आणखी एका कराचा बोजा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 22, 2019 01:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...