पीएम मोदींच्या विजयानंतर कंगना रनौतचं हटके सेलिब्रेशन

पीएम मोदींच्या विजयानंतर कंगना रनौतचं हटके सेलिब्रेशन

अभिनेत्री कंगना रनौत बॉलिवूडमधील अशा कलाकारांपैकी आहे जे लोकसभा निवडणुकीतील पीएम नरेंद्र मोदींच्या विजयामुळे खूश आहेत

  • Share this:

मुंबई, 24 मे : अभिनेत्री कंगना रनौत बॉलिवूडमधील अशा कलाकारांपैकी आहे जे लोकसभा निवडणुकीतील पीएम नरेंद्र मोदींच्या विजयामुळे खूश आहेत आणि सोशल मीडियावरून त्यांचं अभिनंदन करत आहेत. पण कंगनानं या आनंदाच्या सेलिब्रेशनसाठी काहीतरी वेगळं केलं. ती मोदींच्या या विजयामुळे एवढी खूश झाली की तिनं चक्क किचनमध्ये स्वतःच्या हातांनी चहा आणि भजी बनवून घरातील सर्वांना खाऊ घातली.

कंगनाची बहीण रंगोली चंडेलनं काही फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये कंगना किचनमध्ये भजी बनवताना आणि नंतर घरातील सर्व सदस्यांसोबत त्याच्या आस्वाद घेताना दिसत आहे. हे फोटो शेअर करताना, 'कंगना जेव्हा खूप खूश असते, तेव्हा ती किचनमध्ये जाऊन सर्वांसाठी जेवण बनवते. आज पीएम मोदींना मिळालेल्या विजयानंतर ती खूश आहे त्यासाठी तिनं आम्हाला चहा आणि भजीची ट्रीट दिली.' असं कॅप्शन रंगोलीनं दिलं.

कंगनाशिवाय निर्माता अनुराग कश्यप, अनुपम खेर, जूही चावला, हेमा मालिनी, मधुर भांडारकर, रजनीकांत, अदनान सामी, शंकर महादेवन या कलाकारांनी पंतप्रधान मोदींचं अभिनंदन केलं. अभिनेत्री जूही चावलानं मोदींना नव्या ताऱ्याची उपमा दिली आहे. तिनं लिहिलं, 'हर बार मोदी सरकार' तर अनुपम खेर यांनी, 'आएगा तो...' असं ट्वीट केलं होतं.

निर्माता अनुराग कश्यपच्या मुलीला सोशल मीडियावरून बलात्काराची धमकी

 

View this post on Instagram

 

#KanganaRanaut relishing the Eid festivities at the iftar party at her friend and Manikarnika's co-star, @itstahershabbir's place.

A post shared by Kangana Ranaut (@team_kangana_ranaut) on

कंगनाकडे सध्या 'पंगा' आणि 'मेंटल है क्या' असे दोन सिनेमे आहेत. यातील 'मेंटल है क्या'मध्ये ती राजकुमार रावसोबत दिसणार आहे. हा सिनेमा 26 जुलैला रिलीज होणार आहे. याआधी हा सिनेमा आणि ऋतिक रोशनचा 'सुपर 30' एकाच दिवशी रिलीज होणार होते. पण वादापासून लांब राहण्यासाठी ऋतिकनं त्याच्या सिनेमाची तारीख पुढे ढकलली.

असं समोर आलं अनाजी पंतांचं कारस्थान, हत्तीच्या पायाखाली द्यायचं निघालं फर्मान

वयाच्या 53 वर्षीही बाबा बनण्यासाठी सलमानने ठेवली ही अट, म्हणाला मुलं हवी पण...

First published: May 24, 2019, 1:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading