मुंबई, 16 मे- बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सध्या आपल्या आगामी पंगा आणि कान फिल्म फेस्टिव्हलमुळे चर्चेत आहे. 'पंगा' सिनेमात ती कबड्डीपटूची भूमिका साकारताना दिसणार आहे. या भूमिकेसाठी तिने आपलं वजनही वाढवलं होतं. पण आता कानमधील रेड कार्पेट लुकसाठी सध्या ती बरीच मेहनत घेत आहे. तुम्हाला वाचून जरा आश्चर्य वाटेल पण तिने फक्त १० दिवसांमध्ये तब्बल ५ किलो वजन कमी केलं आहे. ही सगळी उठाठेव फक्त रेड कार्पेटसाठी केली जात आहे. कंगनाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर कंगनाची मेहनत चांगलीच दिसत आहे. कंगनाच्या टीमने तिचे पहिले आणि आताचे असे अनेक फोटो शेअर केले आहेत.
Inside Photos- कधीकाळी विकी कौशल असाही दिसायचा यावर तुमचा विश्वास बसणार नाही
कंगनाच्या वेट लॉसमध्ये योगेश भटेजा तिची मदत करत आहे. सध्या बॉलिवूडच्या या क्वीनचा तो फिटनेस ट्रेनर झाला आहे. याबद्दल बोलताना योगेश म्हणाला की, ‘कंगनाला ‘पंगा’ सिनेमासाठी वजन वाढवायचं होतं. यासाठी तिला जास्त कॅलरी असलेलं डाएट फॉलो करावं लागत होतं. 'पंगा'चं चित्रीकरण संपवल्यानंतर तिला लगेच वजन कमीही करयाचं होतं. तिच्यासाठी हे सोपं नव्हतं. कारण वजन कमी करण्यासाठी तिला सरळ कॅलरी कमी करणं आवश्यक होतं. यामुळे ती दिवसाला दोनदा वर्कआउट करायला लागली, तेव्हा जाऊन तिने १० दिवसांमध्ये ५ किलो वजन कमी केलं.’ पण तिच्या फोटोंवर १० दिवसांमध्ये ५ किलो वजन कमी करणं निव्वळ अशक्य असल्याच्या कमेंट करत आहेत.
‘लस्ट स्टोरीज’मधील तो सीन पाहून किआरा आडवाणीच्या आजीने दिली होती ही प्रतिक्रिया
कान फिल्म फेस्टिव्हलसाठी कंगनाने खास प्लॅनिंग केलं आहे. ती रेड कार्पेटवर जड गाउनमध्ये दिसणार नसून फार पारंपारिक भारतीय पेहरावात दिसणार आहे. आपल्या या लुकबद्दल मिड-डेशी बोलताना कंगना म्हणाली की, मी जे कपडे घालेन त्यात ड्रामा असेल. एक भारतीय अभिनेत्री म्हणून माझं कर्तव्य आहे की मी आपली संस्कृती तिथे दाखवावी आणि त्याला प्रोत्साहन द्यावं. मी आणि माझी स्टायलिस्ट एमी पटेल यावर अनेक आठवड्यांपासून काम करत आहोत. फाल्गुनी आणि शेन पीकॉक यांच्या मदतीने आम्ही एक साडी डिझाइन केली आहे. या साडीच्या मार्फत आम्ही विस्मृतीत गेलेल्या नक्षीकामाला जगासमोर आणणं आहे. यामुळे जगाला आपली संस्कृती आणि आपली कला दिसेल.
शुटिंगवेळी या 5 अभिनेत्यांचा झालेला अपघात, विकीला तर पडले 13 टाके
पुलवामातील 3 दहशतवाद्यांच्या एन्काउंटरनंतरचा LIVE VIDEO