मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Lock Upp मध्ये Saisha Shinde चा धक्कादायक खुलासा, मानसिक छळ करायचा बॉयफ्रेंड

Lock Upp मध्ये Saisha Shinde चा धक्कादायक खुलासा, मानसिक छळ करायचा बॉयफ्रेंड

कंगना रणौतच्या Lock Upp शोमध्ये 13 असे स्पर्धक आहेत जे खऱ्या आयुष्यात काही ना काही कारणामुळे वादग्रस्त ठरले आहेत. या शोचे काही एपिसोड्स रीलिज झाल्यानंतर आता प्रत्येक स्पर्धक त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलू लागले आहेत.

  • Published by:  Janhavi Bhatkar
मुंबई, 09 मार्च: सध्या सोशल मीडियावर एका नव्याकोऱ्या शोची चर्चा पाहायला मिळते आहे आणि हा शो म्हणजे 'Lock Upp'. या रिअॅलिटी शोची होस्ट कंगना रणौत (Kangana Ranaut Lock Upp) असून एकता कपूरने याची निर्मिती केली आहे. ALT Balaji या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या Lock Upp शोमध्ये 13 असे स्पर्धक आहेत जे खऱ्या आयुष्यात काही ना काही कारणामुळे वादग्रस्त ठरले आहेत. या शोचे काही एपिसोड्स रीलिज झाल्यानंतर आता प्रत्येक स्पर्धक त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलू लागले आहेत. या रिअॅलिटी शोमध्ये प्रसिद्ध फॅशन डिझायनर साइशा शिंदे (Saisha Shinde in Lock Upp) देखील आहे. साइशाचं आधीचं नाव स्वप्निल असं आहे, तिने गेल्यावर्षीच ती ट्रान्सवुमन असण्याबाबत माहिती दिली होती. साइशाने देखील या शोमध्ये तिच्या रिलेशनशिपबाबत काही गोष्टी सांगितल्या आहेत. यावेळी इतर स्पर्धकांसह बोलताना साइशाने तिच्या आधीच्या रिलेशनशिपमध्ये बॉयफ्रेंडकडून मानसिक छळ सहन केल्याचे सांगितले. 8 मार्च रोजी प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये तिने त्या बॉयफ्रेंडबाबत सांगितले. पायल रोहतगी आणि पूनम पांडे (Payal Rohatgi and Poonam Pandey) यांच्याशी बोलताना तिने या मानसिक छळ करणाऱ्या समलैंगिक (Gay) बॉयफ्रेंडबाबत सांगितले. ती असं म्हणाली की, 'रिलेशनशिपमध्ये जरी माझा छळ होत होता असला तर तो शारिरीक नव्हता. तो एक प्रकारे मानसिक छळ होता. तो माझ्या घराबाहेर उभा राहायचा आणि विचार करायचा की कुणीतरी येईल आणि मी त्याच्यासोबत चीट करेन. जर मी त्याची फसवणूक केली तर मला रेड हँड पकडून या गोष्टीचा वापर माझ्या विरोधात करण्याचा विचार तो करायचा.'
यापुढेही तिने काही धक्कादायक खुलासे केले. ती म्हणाली की, 'तो टेरेस वर जायचा, पाइपलाइवर उभं राहायचा, बाथरुमचे blinders उघडून हे तपासायचा की मी गुपचूप बाथरुममध्ये मास्टरबेट तर करत नाही आहे ना.' साइशा पुढे म्हणाली की तिच्या बॉयफ्रेंडला संशय होता की ती याच कारणामुळे त्याच्यासह कोणते संबंध ठेवत नाही आहे. हे वाचा-Bigg Boss मधील या स्पर्धकाचा सोशल मीडियाला केला 'राम राम', कारणही केलं जाहीर यावेळी बोलताना साइशा शिंदे पुढे असं म्हणाली की ती या नात्यामध्ये खूश नव्हती. तिच्या मते, ती मनातून एक स्त्री होती पण तिने स्वत:ला समजावलं होतं की ती गे आहे. हे वाचा-…आणि विजयालक्ष्मीची Silk Smitaझाली, या बोल्ड अभिनेत्रीचं वादग्रस्त राहिलं आयुष्य हरनाझ कौरसाठी डिझाइन केला होता खास गाऊन
साइशा शिंदेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने हरनाझ संधूसाठी गाऊन डिझाइन केला होता. भारतासाठी मिस यूनिव्हर्स 2021 जिंकून आणणाऱ्या हरनाझला जेव्हा हा पुरस्कार मिळाला त्यावेळी साइशाने डिझाइन केलेल्या या गाऊनची विशेष चर्चा झाली. साइशाने याशिवाय दीपिका पादुकोण, करीन कपूर खान, श्रद्धा कपूर यांसारख्या कलाकारांसह काम केलं आहे.
First published:

Tags: Kangana ranaut

पुढील बातम्या