मुंबई, 24 जानेवारी : बॉलिवूडची पंगा गर्ल कंगना रणौत सध्या तिच्या इमरजंसी सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमात ती इंदिरा गांधीची प्रमुख भूमिका साकारणार आहे. अशातच कंगनानं आणखी एक गुड न्यूज तिच्या चाहत्यांना दिली आहे. कंगना पुन्हा ट्विटवर परत आली आहे. कंगनानं तब्बल दीड वर्षांनी ट्विटवर पोस्ट केली आहे. कंगनानं अचानक हा मोठा धक्का चाहत्यांना दिला आहे. कंगना सध्या ट्विटरवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंडिग आहे. अभिनेत्रीनं तिच्या आगामी इमरजन्सी सिनेमाच्या BTS व्हिडीओ शेअर केला आहे. 2021मध्ये राजकीय वक्तव्यांमुळे कंगनाचं ट्विटर अकाऊंट कायमस्वरूपी सस्पेंड करण्यात आलं होतं. इमरजन्सी सिनेमाचं शुटींग पूर्ण होताच दुसरीकडे कंगनाचं ट्विटर अकाऊंट देखील सुरू करण्यात आलंय.
कंगनानं ट्विटर अकाऊंट पुन्हा मिळाल्याचा आनंद व्यक्त करत ट्विट केलंय. सर्वांना नमस्कार, ट्विटवर परत आल्याचा आनंद झालाय. त्याचप्रमाणे कंगनानं इमरजन्सी सिनेमाचा BTS व्हिडीओ शेअर करत सिनेमाचं शुटींग पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे. तसंच सिनेमाची रिलीज डेटही सांगितली आहे. इमरजन्सी हा सिनेमा 20 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. सिनेमात कंगना इंदिरा गांधींची भूमिका साकारणार असून सिनेमाचा पहिला लुक देखील समोर आला आहे.
हेही वाचा - ऐश्वर्यावर खिळल्या सलमानच्या नजरा; सुभाष घईंच्या बर्थ डे पार्टीत बिग बींच्या सुनेकडे पाहतच राहिला भाईजान
And it’s a wrap !!! Emergency filming completed successfully… see you in cinemas on 20th October 2023 … 20-10-2023 🚩 pic.twitter.com/L1s5m3W99G
— Kangana Ranaut (@KanganaTeam) January 24, 2023
कंगनाचं ट्विटर अकाऊंट 2021साली सस्पेंड करण्यात आलं होतं. कंगनानं बंगाल इलेक्शन दरम्यान झालेल्या हिंसेविरोधात वादग्रस्त ट्विट केलं होतं. या ट्विटमुळे कंगनावर मोठ्या प्रमाणात आगपाखड करण्यात आली. दरम्यान ट्विटरचे कायदे सातत्यानं मोडत असल्याचा आरोप करत ट्विटरकडून कंगनाचं अकाऊंट कायस्वरूपी संस्पेंड करण्यात आलं होतं.
ट्विटर अकाऊंट सस्पेंड झाल्यानंतर कंगनानं आपला मोर्चा Koo या अँपकडे वळवला होता. koo अँपवर कंगना रातोरात स्टार झाली होती. तिथेही कंगना बिनधास्त तिची मतं मांडताना दिसते. कंगनाच्या येऊ घातलेल्या इमरजन्सी सिनेमात कंगनाबरोबर अभिनेते अनुपम खेर, महिमा चौधरी, विशाल नायर आणि श्रेयस तळपदे हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. सिनेमाचं शुटींग पूर्ण झालं आहे. कंगनाचं ट्विटर अकाऊंटही तिला परत मिळालं आहे. आता पंगा गर्ल पुन्हा कोणाशी पंगा घेणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actress, Bollywood News, Social media