कंगना राणावतला शुटिंगदरम्यान पुन्हा दुखापत

कंगना राणावतला शुटिंगदरम्यान पुन्हा दुखापत

जोधपुरमध्ये या सिनेमाचं शुटिंग सुरू असताना कंगनाचा पाय अचानक फ्रॅक्चर झाला आणि लगेचच तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

  • Share this:

24 नोव्हेंबर : बॉलिवूडची क्वीन कंगना राणावत सध्या तिच्या आगामी 'मणिकर्णिका' सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. कंगनाला आता याच सिनेमाच्या शुटिंगदरम्यान पायाला दुखापत झाल्याचं समजतंय.

जोधपुरमध्ये या सिनेमाचं शुटिंग सुरू असताना कंगनाचा पाय अचानक फ्रॅक्चर झाला आणि लगेचच तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

या दरम्यानचे कंगणाचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतायत. या फोटोमध्ये कंगणा व्हिलचेअरवर बसलेली दिसतेय.

या दुखापतीनंतर काही दिवस कंगनाला विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. त्यामुळे कंगना शुटिंग अर्धवट सोडून मुंबईला परतलीय. सिनेमातल्या एका अॅक्शन सीन दरम्यान कंगनाचा हा अपघात घडलाय.

याआधीही कंगणाचा याच सिनेमाच्या शुटिंगदरम्यान सेटवर अपघात घडला होता. हा सिनेमा झाशीच्या राणीवर आधारित असल्याने बॉलिवूडची ही क्वीन सिनेमातील या महत्त्वाच्या भूमिकेसाठी फार मेहनत घेताना दिसतेय.

मध्यंतरी तलवारबाजीचं प्रशिक्षण घेतानाचे कंगणाचे फोटोही सोशल मीडियावर ट्रोल झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 24, 2017 08:56 PM IST

ताज्या बातम्या