Home /News /entertainment /

कंगनाने चित्रपटसृष्टीला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला होता; मात्र एका निर्णयाने अख्खं आयुष्य बदललं

कंगनाने चित्रपटसृष्टीला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला होता; मात्र एका निर्णयाने अख्खं आयुष्य बदललं

7 Year of Queen: 10 वर्ष संघर्ष केल्यानंतरही चित्रपटात येणाऱ्या अपयशामुळे अभिनय क्षेत्राला रामराम ठोकण्याचा निर्णय बॉलीवूड क्वीन कंगना रणौतनं (Kangana Ranaut) घेतला होता.

    मुंबई, 07 मार्च: सात वर्षांपूर्वी जेव्हा 'क्वीन' चित्रपट (Queen) प्रदर्शित झाला होता, तेव्हा कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) अभिनयाचं भरभरून कौतुक करण्यात आलं होतं. कंगनाच्या अप्रतिम अभिनयामुळंच हा चित्रपट सुपरहिट (Super hit) ठरला होता. दर्शकांसोबतचं आणि समीक्षकांनीही कंगनाचं कौतुक केलं होतं. हा चित्रपट कंगनाच्या करियरसाठी गेम चेंजर (Game Changer) ठरला होता. अलीकडेच कंगनाने या चित्रपटाबद्दल अनेक खुलासे केले आहेत. तिने सांगितलं की, ती 'क्वीन' चित्रपटासाठी फारसी उत्सुक नव्हती. ‘क्वीन’ चित्रपटाला सात वर्षे पूर्ण झाल्यानंतर कंगनाने या चित्रपटाबाबत अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत. तिने हा चित्रपट केवळ पैशांसाठी साइन केला असल्याचंही कंगनाने सांगितलं आहे. हा चित्रपट यशस्वी होईल अशी तिची अपेक्षा नव्हती. कंगनाने या चित्रपटाबाबत एक ट्वीट केलं आहे. तिने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, 'दहा वर्षांच्या संघर्षानंतर मला सांगण्यात आलं की, तु चांगली अॅक्टींग करतेस. परंतु तुझे कुरळे केस आणि तुझा आवाज तुझ्या करियरमध्ये बाधा ठरत आहेत. 'क्वीन' हा चित्रपट कधीच प्रदर्शित होणार नाही, हा विचार करून मी तो साइन केला होता. मी हा चित्रपट केवळ पैशांसाठी केला होता. कारण या पैशांतून मला न्यूयॉर्कमधील फिल्म स्कूल अॅडमिशन घ्यायचं होतं. कंगनाने पुढं सांगितलं की, 'मी न्यूयॉर्कमध्ये स्क्रीन रायटींगचा अभ्यास केला होता. तसेच वयाच्या 24 व्या वर्षी मी एक शॉर्ट फिल्म देखील केली होती. त्यामूळेच मला हॉलीवूडमध्ये संधी मिळाली होती. माझं काम पाहिल्यानंतर, एका बड्या कंपनीनं मला चांगलं कामही दिलं होतं. मी अभिनय करण्याची सर्व स्वप्नं सोडून दिली होती. भारतात येण्याची हिम्मतही होत नव्हती. हे ही वाचा-तापसी पन्नूचं हे ट्वीट कंगनाला झोंबलं; म्हणाली 'तु नेहमी स्वस्तंच राहणार...' अभिनय क्षेत्रात निराशा आल्यानंतर हे क्षेत्र सोडण्याची इच्छा झाली होती. अभिनयावरून मन उडालं होतं. आता दिग्दर्शक बनण्याचा प्रवास सुरू करावा, असं वाटत होतं. पण क्वीन चित्रपट प्रदर्शित झाला आणि सगळं चित्रचं बदलून गेलं. 'क्वीन' चित्रपटाच्या यशानं तिच्यासाठी सर्व काही बदललं होतं. भारतीय चित्रपटही बदलला. यानंतर महिला केंद्रित चित्रपटांचा जन्म झाला, असंही तिने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bollywood actress, Kangana ranaut

    पुढील बातम्या