VIDEO : सुनैना रोशन प्रकरणावर अखेर कंगनानं सोडलं मौन

VIDEO : सुनैना रोशन प्रकरणावर अखेर कंगनानं सोडलं मौन

Sunaina Roshan | Hritik Roshan | Kangana Ranaut | काही दिवसांपूर्वीच सुनैनाचा बॉयफ्रेंड रुहैल अमीननं सुद्धा प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आता अभिनेत्री कंगना रणौतनंही या प्रकरणावर मौन सोडलं आहे.

  • Share this:

मुंबई, 29 जून :  अभिनेता हृतिक रोशनची बहीण सुनैना रोशन काश्मीरी पत्रकार रूहैल अमीनसोबतच्या नात्यामुळे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. तिच्या कुटुंबीयांनी तिच्या या नात्यामुळे तिला खूप त्रास दिल्याचा आरोप सुनैनानं केला तसेच रूहैल एक मुस्लीम व्यक्ती असल्यानं माझे कुटुंबीय त्याला स्वीकारायला तयार नाहीत असंही तिनं सांगितलं होतं.

सुनैनानं ट्विटर वरून कंगनाला आपला पाठिंबा असल्याचं जाहीर केल्यानंतर हे सर्व सुरू झालं. त्यानंतर कंगनाची बहीण रंगोलीनं रोशन परिवार सुनैनाला तिचा बॉयफ्रेंड मुस्लीम असल्यानं त्रास देत असल्याचा दावा केला आणि हे संपूर्ण प्रकरण समोर आलं. काही दिवसांपूर्वीच सुनैनाचा बॉयफ्रेंड रुहैल अमीननं सुद्धा प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आता अभिनेत्री कंगना रणौतनंही या प्रकरणावर मौन सोडलं आहे.

'ही' मराठमोळी अभिनेत्री मुलासाठी अमेरिकेत शोधतेय कॉलेज

 

View this post on Instagram

 

#KanganaRanaut during the golden hour, posing next to the lotus pond at Isha Yoga Centre in Coimbatore. She can be seen in a simple attire which signifies the clarity and peace in her mind post yoga-session.

A post shared by Kangana Ranaut (@team_kangana_ranaut) on

कंगनाचा आगामी सिनेमा ‘मेन्टल है क्या’च्या एका मिटिंगनंतर कंगनानं प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. स्पॉटबयच्या वेबसाइटशी बोलताना कंगनानं या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी कंगनाला तु सुनैनाला मदत करणार का असा प्रश्न विचारल्यावर तिनं, ‘तिचे कुटुंबीय तिची काळजी घेत आहेत. त्यामुळे मी त्यांना फक्त शुभेच्छा देऊ इच्छिते’ असं उत्तर दिलं. यानंतर कंगनाला तुझ्याकडे सुनैनानं मदत मागितली होती का असा प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना कंगना म्हणाली, ‘हो आमचं बोलणं झालं होतं मात्र ती आता तिच्या कुटुंबासोबत आहे आणि ते सर्व तिची काळजी घेत आहेत.’

दीपिकानं सांगितलं ‘83’मध्ये रणवीरच्या ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका साकारण्याचं कारण

 

View this post on Instagram

 

#kanganaranaut questioned about #sunainaroshan and this is what she said #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

नुकतच रोशन कुटुंबीयांच्या एक जवळच्या व्यक्तीनं सुनैनाला रोशन कुटुंबीयांनी विरोध करण्यामागचं खरं कारण स्पष्ट केलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार रुहैल आमीन विवाहीत असून त्याची मुलंही आहेत. त्यामुळे राकेश आणि पिंकी रोशन तसेच हृतिक या नात्याच्या विरोधात आहेत. सुनैनानं याआधीच्या तिच्या वैवाहिक आयुष्यात चुका केल्या आहेत त्यामुळे तिनं आता आणखी चुका करू नये असं रोशन कुटुंबीयांना वाटतं.

मलायकानं शेअर केला पोल डान्स पोजमधला फोटो, अर्जुननं कमेंटमध्ये केली ‘ही’ मागणी

============================================================

SPECIAL REPORT : 'नासा' खरंच कृत्रिम ढगांची निर्मिती करणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 29, 2019 03:23 PM IST

ताज्या बातम्या