Home /News /entertainment /

Kangana Ranaut latest news: कंगनाच्या flops चा सिलसिला चालू, सलग 9 वी फिल्म 'धाकड' गेली सपशेल फेल!

Kangana Ranaut latest news: कंगनाच्या flops चा सिलसिला चालू, सलग 9 वी फिल्म 'धाकड' गेली सपशेल फेल!

(kangana ranaut) कंगना रनौत या अभिनेत्रीला चर्चेत असायला काही कारण लागत नाही. तिच्या अगदी प्रत्येक विधानामुळे आणि बेधडक स्वभावामुळे ती अनेक संकटंही ओढवून घेत असते. आता तिच्या संकटात वाढ झाली आहे. याचं कारण काय आहे तुम्हाला माहित आहे का?

पुढे वाचा ...
    मुंबई 29 मे: बॉलिवूडची बेधडक अभिनेत्री कंगना रनौतचा (Kangana Ranaut) दरारा काही अजबच आहे. एखाद्या मुद्द्यावर होणाऱ्या टीकेचा विचार न करता बेधडकपणे मत मांडणारी कंगना आता सगळ्यांच्या माहितीची झाली आहे. हीच बेधडक चमक जर तिच्या चित्रपटातही दिसली तर तिच्या फॅन्सना आनंद होईल असं म्हणायची वेळ आली आहे. तिचा आत्ताच आलेला 'धाकड' हा चित्रपट (Dhaakad movie) सपशेल आपटला असल्याची चर्चा सुरु झाली आहे. याला कारणही तसच आहे. धाकडच्या आठव्या दिवसाची कमाई फक्त 4220 रुपये झाली असून संपूर्ण भारतात मिळून केवळ 20 तिकिटं विकली गेल्याची माहिती समोर येत आहे. एखाद्या बॉलिवूड चित्रपटाने विशेषतः कंगना रनौतसारख्या बॉलिवूड क्वीनच्या चित्रपटाने एवढी कमी कमाई करण्याची कदाचित ही पहिली वेळ असावी. त्यामुळे या वर्षातला बिगेस्ट फ्लॉप म्हणून 'धाकड' कडे बघितलं जात आहे. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार तब्ब्ल 2000 पेक्षा जास्त स्क्रीन्समध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तर वीकएंडच्या जवळ आल्यावर या आकड्यांमध्ये कमालीची घसरण पाहायला मिळाली आहे. येत्या आठवड्याच्या शेवटी या चित्रपटाला सिनेमगृहातून गाशा गुंडाळावा लागतोय असं चित्र दिसत आहे. When they got to know that #Dhaakad first day collection is less than their last movies parking collections. pic.twitter.com/2htO1HWJ4d — ᵀʰᵒʳ (@Stormtweets_) May 21, 2022 20 तिकिटं खपल्याची ही बातमी समोर आल्यावर विविध डिजिटल न्यूज पोर्टलच्या कमेंट सेक्शनमध्ये नेटकऱ्यांना उधाण आलं होतं. अनेकांनी ती 20 तिकीटं काढणाऱ्यांना वेडं ठरवलं आहे. कंगनाची अश्या पद्धतीने फजिती होईल हे कोणालाच अपेक्षित नसल्याने अनेकांनी तिच्याबद्दल दुःख सुद्धा व्यक्त केलं. या संधीचा फायदा घेत ट्विटरवर मात्र मिम्सना उधाण आलं आहे. नेटकऱ्यांनी कंगनाच्या या फ्लॉपची चांगलीच खिल्ली उडवत मजदेर मिम्स शेअर केले आहेत. या संधीचा फायदा घेत ट्विटरवर मात्र मिम्सना उधाण आलं आहे. नेटकऱ्यांनी कंगनाच्या या फ्लॉपची चांगलीच खिल्ली उडवत मजदेर मिम्स शेअर केले आहेत. कंगनासोबत या चित्रपटात अर्जुन रामपाल, दिव्या दत्ता यांची महत्त्वाची भूमिका आहे.
    Published by:Rasika Nanal
    First published:

    Tags: Bollywood actress, Bollywood News, Entertainment, Kangana ranaut

    पुढील बातम्या