मुंबई 17 एप्रिल: देशभरात कोरोनाची (coronavirus) दुसरी लाट आली आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळं या संक्रमणाच्या साखळीला तोडण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं राज्यभरात लॉकडाउन जारी केला आहे. (Maharashtra lockdown) 14 एप्रिल ते 1 मे या काळात संपूर्ण राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध लागू असतील. या काळात काही उद्योगधंदे सुरु राहतील याची देखील काळजी सरकारनं घेतली आहे. मात्र सरकारच्या या निर्णयावर आभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) हिनं ताशेरे ओढले आहेत. हे कसलं लॉकडाउन असं म्हणत तिनं सरकारची खिल्ली उडवली आहे.
मुंबई महानगरपालिकेद्वारे कंगनाचं अनधिकृत बांधकाम पाडण्यात आलं होतं. तेव्हापासून ती सातत्यानं महाराष्ट्र सरकारवर टीका करत आहे. सरकारच्या प्रत्येक निर्णयावर ती प्रश्न उपस्थित करते. यावेळी तिनं लॉकडाउनचं निमित्त साधून उपरोधिक टीका केली आहे. तिनं एका दरवाजाचा फोटो शेअर केला आहे. हा दरवाजा समोरपासून बंद आहे. परंतु, तरी देखील सर्व बाजूंनी खुला आहे. या दरवाजाचा फोटो शेअर करत “महाराष्ट्रात लॉकडाऊन असा आहे” अशी उपरोधिक टीका तिनं केली आहे. तिचं हे ट्विट सध्या चर्चेत आहे.
अवश्य पाहा - सुपरहिट चित्रपटासाठी चाहते करतात दुधानं अभिषेक; पाहा दानशूर विक्रमचा थक्क करणारा प्रवास
Meanwhile..... pic.twitter.com/uoyiERkDx7
— Kangana Ranaut (@KanganaTeam) April 16, 2021
लॉकडाउनमध्ये कुठल्या सेवा सुरु आहेत?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Kangana ranaut, Lockdown, Uddhav thackeray