'मणिकर्णिका' कडाडली, पुलवामा हल्ल्यावरून जावेद - शबाना आझमींना फटकारलं

पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यानंतर अभिनेत्री कंगना राणौतनं जावेद अख्तर, शबाना आझमी आणि नवज्योत सिंग सिद्धूवर हल्लाबोल केला आहे.

  • Share this:

पुलवामा इथे दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघातकी हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाले. यानंतर देशातील प्रत्येकानं पाकचा जोरदार निषेध केला. या घटनेनंतर जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांनी पाकिस्तानातले नियोजित कार्यक्रम रद्द करत पाकिस्तानला न जाण्याचा निर्णय घेतला. पण, त्यानंतर देखील कंगनानं जावेद अख्तर आणि शबाना आझमींवर टीका केली आहे.

याच लोकांनी पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये काम देण्याचं समर्थन केलं होतं. शिवाय, 'भारत तेरे तुकडे होंगे' असं म्हणणाऱ्या लोकांना यांनीच पाठिंबा दिला होता. पण, आता आपली कृत्य लपवण्यासाठी अशा प्रकारचं काम केलं जात असल्याचं म्हणत कंगनानं जावेद अख्तर आणि शबाना आझमींवर टीका केली आहे.

दरम्यान, आता आपल्याला कलाकारांच्या बंदीवर नाही तर, पाकिस्तानला धडा शिकवण्यावर केंद्रीत केला पाहिजे असं देखील कंगनानं म्हटलं आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर कंगनानं मणिकर्णिका चित्रपटाची सक्सेस पार्टी रद्द केली. यावेळी तिनं पाकिस्तान आपल्या केवळ सुरक्षा व्यवस्थेशी खेळत नसून त्यांनी आम्हाला आव्हान दिलं आहे. त्यामुळे पाकिस्तानला आता धडा शिकवण्याची वेळ आल्याचं देखील कंगनानं म्हटलं आहे.

दरम्यान, दहशतवादी हल्ल्यासाठी आपण संपूर्ण पाकिस्तानला जबाबदार धरता येणार नाही असं वक्तव्य नवज्योत सिंग सिद्धूनं केलं. त्यानंतर सिद्धूची सोनी वाहिनीनं द कपिल शर्मा शोमधून गच्छंती केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 16, 2019 05:53 PM IST

ताज्या बातम्या