मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Kangana Ranaut: कंगनाने थेट लता मंगेशकरांशी केली स्वत:ची तुलना; म्हणाली 'मी सुद्धा पैसे घेऊन नाचत...'

Kangana Ranaut: कंगनाने थेट लता मंगेशकरांशी केली स्वत:ची तुलना; म्हणाली 'मी सुद्धा पैसे घेऊन नाचत...'

कंगना राणौत

कंगना राणौत

कंगनाने तिच्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ शेअर करत लग्न किंवा एखाद्या समारंभात डान्स करण्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 23 डिसेंबर : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आपल्या बिनधास्त स्वभावामुळे ओळखली जाते. कंगना स्पष्टवक्ती आहे. तिचे मत ती बिनधास्तपणे मांडते. कंगना तिच्या बेधडक स्वभावासाठी लोकप्रिय आहे. ती प्रत्येक बाबीवर तिचे मत स्पष्टपणे मांडते आणि त्याची चर्चा सुरु होते.  आता देखील तिने असेच वक्तव्य केले आहे ज्याची सगळीकडे चर्चा होतेय. कंगनाने तिच्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ शेअर करत लग्न किंवा एखाद्या समारंभात डान्स करण्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

कंगना राणौतने शुक्रवारी 23 डिसेंबर रोजी आशा भोसलेचा एक व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आशा भोसले बहिण लता मंगेशकर यांच्या आयुष्याशी निगडीत गोष्ट सांगताना म्हणतात, 'लता मंगेशकर यांनी एका लग्नात गाणं गाण्यासाठी १ मिलियन डॉलरची ऑफर नाकारली होती. तुम्ही ५-१० मिनिटे तरी येऊन जा, असेही समोरची व्यक्ती दीदींना सांगत होती. पण त्यांनी स्पष्ट भाषेत नकार दिला. मला ५ मिलियन डॉलर दिले तरीही मी अशा ठिकाणी येणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले होते.'

हेही वाचा - Kangana Ranaut: 'मला भीती वाटत होती की कोणी...' बहिणीवर अॅसिड हल्ल्यानंतर अशी झाली होती कंगनाची अवस्था

हा व्हिडीओ शेअर करत कंगना म्हणाली, ''मी या गोष्टीशी सहमत आहे. इतकंच नव्हे तर मी कधीही लग्न किंवा अशा खासगी पार्ट्यांमध्ये जाऊन डान्स केलेला नाही. माझ्याकडे इतकी लोकप्रिय गाणी असतानाही मी कधीही असे केलेले नाही. यातून मिळणारी मोठी रक्कम नाकारली. मी जेव्हा हा व्हिडीओ पाहिला तेव्हा मला फार आनंद झाला. लताजी खरंच खूप प्रेरणादायी आहेत.” असे वक्तव्य तिने केले आहे.

कंगनाने मांडलेल्या या मताशी अनेक जण सहमत आहेत तर काही जण तिला ट्रोल  देखील करत आहेत.

कंगना रणौत सध्या 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटातील कंगनाचा फर्स्ट लूकही रिलीज झाला आहे. कंगना राणौत 'इमर्जन्सी'ची निर्माती आणि दिग्दर्शिका आहे. तिच्या लूकची सगळेकडेच चर्चा होत आहे. कंगना व्यतिरिक्त या चित्रपटात मिलिंद सोमण, महिमा चौधरी, सतीश कौशिक, अनुपम खेर, श्रेयस तळपदे हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. कंगनाने या चित्रपटातील सर्व पात्रांचे लूक आधीच उघड केले आहेत. हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

First published:

Tags: Bollywood actress, Kangana ranaut