Home /News /entertainment /

‘मी बोलले होते बॉलिवूड गटार आहे’; पॉर्न प्रकरणात कंगना रणौतची उडी

‘मी बोलले होते बॉलिवूड गटार आहे’; पॉर्न प्रकरणात कंगना रणौतची उडी

कंगना रणौत (Kangana Ranaut) हिने देखील या पॉर्न प्रकरणात उडी घेतली आहे. बॉलिवूड एक गटर आहे असं म्हणत तिने राजवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

    मुंबई 21 जुलै: अनधिकृतरित्या पॉर्न चित्रपटांची निर्मिती केल्याप्रकरणी शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) याला अटक करण्यात आली आहे. (Pornography in India) पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. मात्र या अटकेमुळे शिल्पा आणि राजवर जोरदार टीका केली जात आहे. दरम्यान वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) हिने देखील या पॉर्न प्रकरणात उडी घेतली आहे. बॉलिवूड एक गटर आहे असं म्हणत तिने राजवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. तब्बल 6 महिन्यांच्या तपासानंतर राज पर्यंत पोहोचले पोलीस; मुंबई ते लंडन असं चालायचं काम नेमकं काय म्हणाली कंगना? “...म्हणूनच मी या मुव्ही इंडस्ट्रीला गटर म्हणते. चमकणारी प्रत्येक गोष्ट सोनं नसते. मी माझ्या आगामी टीकू वेड्स शेरू या चित्रपटात फिल्मी उद्योगाचा हा काळा चेहरा जगासमोर आणणार आहे. या क्रिएटिव्ह उद्योगात आपल्याला काही नियमांची गरज आहे. असे नियम जे चुकीची कामं करण्यांवर नजर ठेवतील.” अशा आशयाची इन्स्टाग्राम पोस्ट करत कंगनाने राज कुंद्रावर निशाणा साधला आहे. तिची पोस्ट सध्या चर्चेत आहे. मुंबई पोलिसांचा मोठा खुलासा; राज कुंद्रा या कंपनीसाठी करत होता पॉर्नोग्राफी राज कुंद्रा कसा करायचा Pornography बिझनेस?   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राज लंडनमधील केनरिन नामक एका कंपनीसाठी या पॉर्नपटांची निर्मिती करतो. ही कंपनी भारतात हॉटशॉट नावाचं एक अॅप चालवते. या अॅपवर इतर OTT प्लॅटफॉर्मप्रमाणे महिन्याचं वगैरे सबस्क्रिप्शन मिळत नाही. तर प्रेक्षकांना प्रत्येक चित्रपट किंवा सीरिजसाठी वेगळे पैसे द्यावे लागतात. आज तकने दिलेल्या वृत्तानुसार राजने या अॅपवरील अश्लील व्हिडीओंच्या माध्यमातून जवळपास 500 कोटी रुपयांचा नफा आतापर्यंत मिळवला आहे. इंटरनेटवर हजारो पॉर्न वेबसाईट कार्यरत आहेत. गुगलच्या एका सर्वेनुसार भारतातील इंटरनेट युजर सरासरी 8 मिनिटं 23 सेकंद अशा वेब साईटवर घालवतो. या पार्श्वभूमीवर हॉटशॉटने कमी वेळात मोठ्या प्रमाणावर सबस्क्राईबर्स मिळवले होते. अन् त्यामधून नफा देखील कोट्यवधींचा मिळत होता.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Kangana ranaut, Raj kundra, Shilpa shetty

    पुढील बातम्या