Home /News /entertainment /

‘दहशत पसरवणारे आज स्वत: कोरोनाच्या दहशतीखाली’; कंगनानं साधला उद्धव ठाकरेंवर निशाणा

‘दहशत पसरवणारे आज स्वत: कोरोनाच्या दहशतीखाली’; कंगनानं साधला उद्धव ठाकरेंवर निशाणा

'मुख्यमंत्र्यांची ही अवस्था पाहून आश्चर्य वाटतंय'; कंगनानं उडवली उद्धव ठाकरेंची खिल्ली

    मुंबई 11 एप्रिल: अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत असते. बॉलिवूडमधील घराणेशाही ते देशभरातील राजकारण अशा विविध विषयांवर ती रोखठोकपणे आपल्या भूमिका मांडते. यावेळी तिनं कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणाचं निमित्त साधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “जो व्यक्ती आधी स्वत: दहशत पसरवत होता आता तोच कोरोनाच्या दहशतीखाली जगतोय.” अशी जोरदार टीका तिनं केली आहे. “हे शहर आता जणू एखाद्या सांगाड्यासारखं भासतंय. कधीकाळी जे इतरांना स्वत:च्या दहशतीनं घाबरवत होते. आज ते स्वत: कोरोनाच्या दहशतीखाली जगतायेत. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची ही स्थिती पाहून मला आश्चर्य वाटतंय. जय मुंबा देवी.” अशा आशयाचं ट्विट करुन तिनं मुख्यमंत्र्यांवर थेट निशाणा साधला आहे. काही महिन्यांपूर्वी मुंबई महानगरपालिकेनं कंगनानं केलेलं अनधिकृत बांधकाम पाडलं होतं. तेव्हापासून ती सातत्यानं महाराष्ट्र सरकारवर टीका करत आहे. कंगनाचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. दरम्यान या ट्विटवर महाराष्ट्र सरकारनं अद्याप कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. अवश्य पाहा - बिग बींचा ‘जलसा’ बंगला आहे ऐतिहासिक; या प्रसिद्ध व्यक्तीनं केलं होतं मुळ बांधकाम देशात २४ तासांत आढळले 1 लाख 52 हजार 879 पॉझिटिव्ह रुग्ण केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 24 तासांत आढळून आलेल्या रुग्णांची आणि मृतांची आकडेवारी जाहीर केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे देशातील सर्वाधिक रुग्णावाढ नोंदवण्यात आली आहे. देशात 24 तासांत 1 लाख 52 हजार 879 करोनाबाधित आढळून आले आहेत. तर 90 हजार 584 रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. चिंतेची बाब देशातील मृतांची संख्याही वाढली आहे. 24 तासांत 839 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशात आतापर्यंत 1 लाख 69 हजार 275 जणांचा मृत्यू झाला आहे.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Coronavirus symptoms, Kangana ranaut, Uddhav thackeray

    पुढील बातम्या