मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Kangana Ranaut : 'ती एकटीच बॉलिवूडला...'; 'दृश्यम 2'मधील तब्बूविषयी कंगनाचं मोठं वक्तव्य

Kangana Ranaut : 'ती एकटीच बॉलिवूडला...'; 'दृश्यम 2'मधील तब्बूविषयी कंगनाचं मोठं वक्तव्य

कंगना रणौत

कंगना रणौत

यावर्षी बॉलिवूडचे 'भूल भुलैया 2' आणि 'दृश्यम 2' हे दोनच चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले आहेत. या दोन्ही चित्रपटांमध्ये अभिनेत्री तब्बूने काम केले आहे.आता याविषयीच कंगनाने मोठं भाष्य केलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई, 20 नोव्हेंबर: बॉलिवूड अभिनेत्री तब्बूचा 'दृश्यम 2' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ घालत आहे. बॉलिवूडच्या चित्रपटांबाबत सध्या प्रेक्षकांमध्ये नकात्मक वातावरण आहे. या वातावरणात  'दृश्यम 2' हा सिनेमा बॉलीवूडला तारणार असं दिसतंय. या चित्रपटातील सगळ्याच कलाकारांच्या अभिनयाचं करुक सगळीकडे होत आहे. आता याच दरम्यान, कंगना राणौतने चित्रपटातील एका कलाकाराचं जोरदार कौतुक केलं आहे.  हिंदी चित्रपटसृष्टीला तारणारा सुपरस्टार असे तिने अभिनेत्री तब्बूला म्हटलं आहे.  कंगनाने रविवारी तिच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत तब्बूचे कौतुक केले आहे. यावर्षी बॉलिवूडचे 'भूल भुलैया 2' आणि 'दृश्यम 2' हे दोनच चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले आहेत. या दोन्ही चित्रपटांमध्ये अभिनेत्री तब्बूने काम केले आहे.

तब्बूचं कौतुक करताना कंगनाने लिहिलंय कि, '' ५० वर्षांचा टप्पा ओलांडूनही ती एकटी हिंदी चित्रपटसृष्टीला वाचवत आहे. अभिनेत्री पुढे म्हणाली कि, 'तिची प्रतिभा आणि सातत्य यावर कधीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकत नाही, परंतु वयाच्या या टप्प्यावर स्टारडमच्या शिखरावर पोहोचणे खरोखरच कौतुकास्पद आहे.'

हेही वाचा - मराठी टेलिव्हिजन ते 'दृश्यम 2' मराठमोळ्या अभिनेत्याची गगनभरारी; चाहत्यांकडून होतंय कौतुक

या पोस्टमध्ये कंगनाने तब्बू तिच्यासाठी एक प्रेरणा असल्याचं सांगितलं आहे. अभिनेत्रीने पुढे लिहिले, "मला वाटते की महिलांना त्यांच्या कामाबद्दलच्या त्यांचे  अधिक श्रेय दिले पाहिजे... त्या खरोखरच एक प्रेरणा आहेत.''

तब्बू याआधी 'भूल भुलैया 2' या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 14 कोटींचा व्यवसाय केला होता. या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर एकूण 185.92 कोटींचा व्यवसाय केला होता. या चित्रपटात तब्बू सोबतच कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

अजय देवगण स्टारर 'दृश्यम 2' 18 नोव्हेंबरला रिलीज झाला आहे. या चित्रपटात अजय देवगण, श्रीया सरन सोबतच तब्बू आणि अक्षय खन्ना यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाने दोन दिवसांत 37.07 कोटींची कमाई केली आहे. दृष्यम 2 हा याच नावाच्या मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे जो 2021 मध्ये प्रदर्शित झाला होता. श्रिया सरन या चित्रपटात अजय देवगणच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. त्याचबरोबर इशिता दत्ता त्याच्या मुलीच्या भूमिकेत दिसली आहे. हा चित्रपट पहिल्याच आठवड्यात १०० कोटींचा टप्पा पार करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

First published:

Tags: Bollywood actress, Entertainment, Kangana ranaut