मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

ठाकरे सरकारवर टीका करण्यावरून हायकोर्टाने कंगनाला बजावले

ठाकरे सरकारवर टीका करण्यावरून हायकोर्टाने कंगनाला बजावले

'कोणत्याही नागरिकाने बेजबाबदार वक्तव्ये केली तर त्याकडे सरकार व प्रशासनाने दुर्लक्ष करणे हेच सोईस्कर आहे. बेजबाबदार वक्तव्ये करून कितीही मूर्खपणा केला'

'कोणत्याही नागरिकाने बेजबाबदार वक्तव्ये केली तर त्याकडे सरकार व प्रशासनाने दुर्लक्ष करणे हेच सोईस्कर आहे. बेजबाबदार वक्तव्ये करून कितीही मूर्खपणा केला'

'कोणत्याही नागरिकाने बेजबाबदार वक्तव्ये केली तर त्याकडे सरकार व प्रशासनाने दुर्लक्ष करणे हेच सोईस्कर आहे. बेजबाबदार वक्तव्ये करून कितीही मूर्खपणा केला'

मुंबई, 27 नोव्हेंबर : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (kangana ranaut) विरुद्ध शिवसेनेच्या (Shivsena) वाद अखेर मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) निकाली निघाला आहे. कंगनाच्या कार्यालयावर तोडकाम केल्या प्रकरणी हायकोर्टाने मुंबई पालिकेची (BMC) कारवाई बेकायदेशीर असल्याची ठरवली आहे. तर दुसरीकडे कंगनालाही व्यक्ती आणि ठाकरे सरकारविरोधात टीका करण्यास बजावले आहे.

कंगना रनौतच्या कार्यालयावर मुंबई पालिकेनं तोडकाम केले होते. या प्रकरणी मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायाधीश शाहरुख काथावाला व न्यायाधील रियाझ छागला यांनी कंगनाची सुद्धा कानउघडणी केली आहे.

'मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणे, व्यक्तींविरोधात आक्षेपार्ह विधाने करणे, सरकारच्या विरोधात विधाने करणे या कंगनाच्या कृतीला हायकोर्ट मान्यता देत नाही. त्याच्याशी हायकोर्ट सहमत नाही. कंगनाने भविष्यात असे ट्विट करण्यापासून स्वतःला रोखावे' अशा शब्दांत हायकोर्टाने कंगनाला समज दिला आहे.

'कोणत्याही नागरिकाने बेजबाबदार वक्तव्ये केली तर त्याकडे सरकार व प्रशासनाने दुर्लक्ष करणे हेच सोईस्कर आहे. बेजबाबदार वक्तव्ये करून कितीही मूर्खपणा केला, ती वक्तव्ये कितीही त्रासदायक असली तरी सरकारी प्रशासने त्याविरोधात कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन व कु-हेतूने कारवाई करू शकत नाही, असंही हायकोर्टाने पालिकेला बजावले आहे.

महापालिकेने बजावलेली नोटीस आणि त्यानंतर तोडकामाचा काढलेला आदेश दोन्ही हायकोर्टाने रद्दबातल केले आहे.  तो बंगला राहण्यायोग्य होण्यासाठी महापालिकेला काम करून द्यावे लागेल, असे आदेशही हायकोर्टाने पालिकेला दिले आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबई पाकव्याप्त भाग आहे आणि मुंबई पोलिसांबद्दल वक्तव्य केल्यामुळे शिवसेना Vs कंगना असा वाद पेटला होता. या वादाला 9 सप्टेंबर रोजी नवीन वळण मिळाले. मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाली हिल वांद्रे परिसरातील कार्यालयावर हातोडा चालवला.

कंगनाने आपल्या कार्यालयाच्या समोर अनधिकृतरित्या स्लॅबही उभारला आणि  दुसऱ्या मजल्यावर अनधिकृत बाल्कनी उभारली. तसंच कंगनाने आपल्या ऑफिसच्या पहिल्या मजल्यावर अनधिकृत शौचालय उभारले. देवघर आणि लिव्हिंग रुममध्ये अनधिकृत केबिन आणि लाकडी पार्टिशन तयार केले, असल्याचा ठपका पालिकेनं ठेवला होता. त्याचबरोबर, तळ मजल्यावर अनधिकृतरित्या किचन,   ग्राऊंड फ्लोअरवर पायऱ्यांवर बेकायदेशीररित्या शौचालय उभारण्यात आल्याचा दावाही पालिकेनं केला होता.

कंगनाने हे ऑफिस मनिकर्निका सिनेमाच्या आधी उभारले होते. पण, यात बरेच बांधकाम हे अधिकृत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आधी कंगनाला नोटीस बजावली होती. त्यानंतर 9 सप्टेंबर रोजी जेसीबी चालवून थेट कारवाई केली होती.

First published: