Home /News /entertainment /

VIDEO: कंगना राणौतला अश्रू अनावर; दिग्दर्शकाबद्दल बोलता बोलता झाली भावुक

VIDEO: कंगना राणौतला अश्रू अनावर; दिग्दर्शकाबद्दल बोलता बोलता झाली भावुक

बॉलिवूड क्वीन कंगना राणौतचा (Kangana Ranaut) बहुप्रतिक्षित सिनेमा 'थलायवी'चा ट्रेलर (Thalaivi Trailer) प्रदर्शित झाला आहे. या कार्यक्रमात तिला अश्रू अनावर झाले आहेत. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतं आहे.

    मुंबई, 22 मार्च: बॉलिवूड क्वीन कंगना राणौतचा (Kangana Ranaut) बहुप्रतिक्षित सिनेमा 'थलायवी'चा ट्रेलर (Thalaivi Trailer) प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून कंगनाच्या अभिनयापासून ते तिच्या बॉडी ट्रान्सफोर्मेशनबाबत प्रत्येक गोष्टीचं कौतुक केलं जात आहे. या चित्रपटात कंगना रणौतनं तिचं 20 किलो वजन वाढवलं होतं, त्यानंतर ते कमीही केलं होतं. तिच्यासाठी हा चित्रपट खूपच आव्हानात्मक होता, असंही कंगनाने सांगितलं आहे. यावेळी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चच्या एका कार्यक्रमात कंगनाला आपले अश्रू अनावर झाले. यावेळी ती खूपच भावुक झाली. थलायवी चित्रपटाचे दिग्दर्शक विजय यांच्याबद्दल बोलताना कंगना अचानक भावूक (kangana get emotional) झाली. कंगना म्हणाली की, 'मी माझ्या आयुष्यात कधीही अशा व्यक्तीला भेटले नाही, ज्याने माझ्या टॅलेंटवर शंका उपस्थित नाही केली. परंतु मला इथे सांगायला आवडेल की, ती एक अशी व्यक्ती आहे, ज्याने माझ्या टॅलेंटला नावाजलं आहे आणि चांगला प्रतिसादही दिला आहे. ज्या स्तरावर पुरुष नायकाचे चित्रपट बनवले जातात, त्यास्तरावर अभिनेत्रींचे चित्रपट बनवले किंवा दाखवले जात नाहीत. पण दिग्दर्शक म्हणून मी त्यांच्याकडून एखाद्या कलाकाराशी कसं वागायचं हे शिकले आहे. तसंच क्रिएटिव्ह पार्टनरशिप काय असते? हेही मला शिकायला मिळालं.' हा संवाद साधताना कंगना आपले अश्रू रोखू नाही शकली. थलायवी या चित्रपटात कंगना राणौत तामिळनाडूच्या माजी दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांची व्यक्तीरेखा साकारताना दिसणार आहे. थलायवी या चित्रपटाचा ट्रेलर आज कंगनाच्या वाढदिवशी चेन्नई आणि मुंबई या दोन्ही ठिकाणाहून एकाच वेळी प्रदर्शित करण्यात आला  आहे. हा ट्रेलर प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक चाहत्यांनी कंगनाच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. (वाचा-वाढदिवशी कंगनाचा डबल धमाका! Thalaivi च्या ट्रेलरनंतर Tejas चा नवा लुकही जारी) कंगनाने या चित्रपटात जयललिता यांची हुबेहुब व्यक्तिरेखा साकारली आहे. या चित्रपटात कंगनाने आपल्या दमदार आवाजाची झलक दाखवली आहे. थलायवी या चित्रपटाची कथा 'एका प्रसिद्ध अभिनेत्रीपासून ते यशस्वी राजकारणी बनलेल्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या संघर्षाची कहाणी आहे. हा चित्रपट येत्या 23 एप्रिलला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bollywood actress, Kangana ranaut, Video

    पुढील बातम्या