"आमच्या देवभूमीत मुंबईकर आलेत, पण त्यांना हरामखोर म्हटलं जात नाही", कंगनाचा सेनेला पुन्हा सणसणीत टोला

शिवसेना नेते संजय राऊत यांनी उल्लेख केलेल्या हरामखोर शब्दावरून कंगना रणौतने (kangana ranaut) शिवसेनेला पुन्हा लक्ष्य केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 31 ऑक्टोबर : अभिनेत्री कंगना रणौत (kangana ranaut) पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर बरसली आहे. शिवसेना (shivsena) नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी तिच्याबाबत वापरलेल्या हरामखोर या शब्दाला ती अजूनही विसरली नाही. न्यायालयात संजय राऊत यांच्या शब्दाची शहानिशा झाली. मात्र तरी कंगना या शब्दावरून ठाकरे सरकारला सातत्याने टार्गेट करते आहे. कंगनानं नुकतंच एक ट्वीट केलं आहे, ज्यामध्ये तिनं देवभूमीत कुणालाही हरामखोर, नमकहराम म्हटलं जात नाही असं म्हटलं.

कंगनाने एका वेबसाईटवरील फिल्मच्या शूटसंबंधी बातमी शेअर करत हे ट्वीट केलं आहे. भूत पोलीस फिल्मच्या शूटिंगसंबंधातील ही बातमी. या फिल्मचं शूटिंग हिमाचल प्रदेशमध्ये होणार आहे. त्यासाठी सैफ अली खान, जॅकलीन फर्नांडिस, अर्जुन कपूर मुंबईहून हिमाचल प्रदेशला रवाना झाले. त्यावरून कंगनाने आमच्या देवभूमीत मुंबईकर आलेत, पण त्यांना हरामखोर म्हटलं जात नाही, असं म्हणत सेनेला पुन्हा सणसणीत टोला लगावला आहे.

ही बातमी पाहिल्यानंतर कंगनानं ट्वीट केलं, "मुंबईतील जास्तीत जास्त फिल्म युनिट्स सध्या हिमाचल प्रदेशमध्ये येत आहेत. आम्ही त्यांचं स्वागत करत आहोत. देवभूमी ही प्रत्येक भारतीयाची आहे आणि कुणीही इथं पैसे कमवू शकतो. या राज्यात कुणालाच हरामखोर किंवा नमकहराम म्हटलं जात नाही आणि कुणी तसं केलं तर मी त्याचा निषेध करेन, बुलिवूडसारखं गप्प राहणार नाही"

हे वाचा - BIGG BOSS: 'वडिलांनी माझ्यासाठी काही केलं तर..' सल्लूमियाँची वादात उडी

शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगना रणौतला हरामखोर म्हचलं होतं. त्यानंतर एका वृत्त वाहिनीशी बोलताना त्यंनी या शब्दाचा अर्थही उलगडून सांगितला होता. हरामखोर म्हणजे मराठी भाषेत बेईमान असा होतो. ती नॉटी म्हणजे खट्याळ मुलगी आहे आणि बेईमान आहे. असं मला वाटतं, असं ते म्हणले होते. दरम्यान मुंबईत हायकोर्टातही संजय राऊत यांच्या हरामखोर या वक्तव्याचीही शहानिशा झाली होती. याबाबत स्पष्टीकरण मागण्यात आलं होतं. त्यावेळी संजय राऊत यांच्या वकिलांनी माझ्या अशीलांनी कोणाचं नाव घेतलं नाही असं सांगितलं होतं.

Published by: Priya Lad
First published: October 31, 2020, 7:56 PM IST

ताज्या बातम्या