'माझं डोकं शरमेने झुकलंय...' आंदोलन समर्थक बॉलिवूडकरांवर कंगनाचा निशाणा

'माझं डोकं शरमेने झुकलंय...' आंदोलन समर्थक बॉलिवूडकरांवर कंगनाचा निशाणा

प्रजासत्ताक दिनी (Republic Day) शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅली (Tractor rally) दरम्यान शेतकरी आंदोलनाला (Farmer protest Violence) हिंसक वळण लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर कंगनाने (Kangana ranaut) आता शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या बॉलिवूडकरांवर (Bollywood) निशाणा साधला आहे.

  • Share this:

मुंबई, 27 जानेवारी: बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत (kangana ranaut) सुरुवातीपासूनच शेतकरी आंदोलनाला विरोध करत आहे. तिने सुरुवातीला ज्यावेळी शेतकरी आंदोलनाला विरोध विरोध केला होता, त्यावेळी कंगनाला नेटकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. अनेक बॉलीवूड कलाकारांनी कंगनाच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. तर काहींनी तिला सुनावलं होतं. परंतु मंगळवारी प्रजासत्ताक दिनी (Republic Day violence) शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅली (Farmer's protest tractor ralley) दरम्यान या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. पोलीस आणि शेतकरी आमने सामने उभे ठाकलेलं पाहायला मिळालं. याच पार्श्वभूमीवर कंगनाने आता शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या बॉलिवूडकरांवर निशाणा साधला आहे.

कंगनाने ही प्रतिक्रिया सौरभ चौधरी नावाच्या ट्विटर युजरच्या ट्विटला कोट करून दिली आहे. या ट्विटमध्ये सौरभने लिहिलं आहे की- 'शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली निषेध करणाऱ्या लोकांच्या हेतूबद्दल कंगना प्रश्न विचारत होती, त्यावेळी कंगनाला ट्रोल करणारे बॉलिवूडचे क्रांतिकारक कुठे आहेत? असा प्रश्न सौरभ चौधरी यांनी उपस्थित केला. या ट्वीटला उत्तर देताना कंगनानेही एक ट्विट केलं आहे.

यावेळी कंगनाने लिहिलं की- 'हा संघर्ष टाळण्याचा मी खूप प्रयत्न केला पण मला अपयश आलं. देशात सुरू असलेल्या गोष्टींबद्दल मी एक अंदाज लावू शकत होते, पण हे माझं खूप मोठं अपयश आहे. माझी मान लज्जेनं झुकली आहे. मला लाज वाटते की, आपल्या देशाच्या एकतेचं मला संरक्षण करता आलं नाही. मी कोणीही नसली, तरीही मी प्रत्येकजण आहे. पण मी आज अपयशी ठरले आहे.

या ट्वीटच्या माध्यमातून कंगना राणौतने दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या बॉलिवूडकरांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. यामध्ये दिलजित दोसांझ पासून स्वरा भास्करपर्यंत अशा अनेक कलाकारांचा समावेश आहे.

Published by: News18 Desk
First published: January 27, 2021, 5:40 PM IST

ताज्या बातम्या