‘अशा महिलांनाच बलात्काऱ्यांसोबत 4 दिवस जेलमध्ये ठेवा', पाहा कोणावर भडकली कंगना

‘अशा महिलांनाच बलात्काऱ्यांसोबत 4 दिवस जेलमध्ये ठेवा', पाहा कोणावर भडकली कंगना

पंगा सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंग दरम्यान निर्भया गँगरेप प्रकरणाविषयी कंगनाला प्रश्न विचारण्यात आले.

  • Share this:

मुंबई, 23 जानेवारी : आपल्या स्पष्ट आणि बेधडक स्वभावासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रणौत सध्या तिचा आगामी सिनेमा पंगाच्या प्रमोशनमध्ये बीझी आहे. पण तरीही सामाजिक मुद्द्यांवर आवाज उठवणं तिनं थांबवलेलं नाही. नुकत्याच प्रमोशन प्रेस कॉन्फरन्समध्ये कंगना राणौतला निर्भया गँगरेप प्रकरणातील आरोपींसाठी वकील इंदिरा जयसिंह यांच्या अपीलवर प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना कंगनानं इंदिरा जयसिंह यांच्यावर थेट निशाणा साधत आपला राग व्यक्त केला.

काही दिवसांपूर्वी जेष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांनी निर्भयाच्या आईकडे अपील केलं होतं की, सोनिया गांधींनी जसं राजीव गांधीच्या मारेकऱ्यांना माफ केलं होतं तसं या आरोपींनाही माफ करायला हवं. त्यांच्या या वक्तव्यावरुन देशभरात संतापाची लाट उसळली होती. याबद्दलच इंदिरा यांच्या अपीलवर कंगनाला तिचं मत विचारण्यात आलं. यावर कंगना म्हणाली, ‘अशा महिलांनाच या बलात्काऱ्यांसोबत 4 दिवस जेलमध्ये ठेवायला हवं. त्यानंतर त्यांना समजेल. इंदिरा जयसिंह सारख्या महिलांच्या पोटीच असे बलात्कारी जन्म घेतात. खरं तर या दोषाींना भरचौकात फाशी द्यायला हवी.’

मलायका अरोराच्या नव्या योगा पोझचा इंटरनेटवर धुमाकूळ, पाहा Latest Photo

ज्याला बलात्कार माहित आहे तो अल्पवयीन कसा काय

मुंबईमध्ये नुकतीच पंगा सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंग दरम्यान प्रेस कॉन्फरन्स झाली. यावेळी निर्भया गँगरेप प्रकरणाविषयी कंगनाला प्रश्न विचारण्यात आले. त्यावर उत्तर देताना कंगनानं या आरोपींना शिक्षा देण्यासाठी केल्या जाणाऱ्या विलंबावर नाराजी व्यक्त केली. अशा लोकांना सर्वांसमोर फाशी द्यायला हवी म्हणजे इतरांना त्यातून कायद्याचा धाक निर्माण होईल असं मतही कंगनानं मांडलं.

कंगनाने टीम इंडियातल्या 'या' क्रिकेटपटूला म्हटलं पंगेबाज

या प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलताना कंगना म्हणाली, निर्भयाचे आई-वडील एवढ्या वर्षांपासून आपल्या मुलीला गमावल्याचं दुःख सहन करत आहे. अशात या दोषींना शांतपणे मारण्याचा काय फायदा. आपण अशाप्रकारे आरोपींना मारुन कोणतंही उदाहरण सेट करु शकत नाही. त्यामुळे या दोषींना भरचौकात फासावर चढवायला हवं.

दिल्लीच्या पटियाला हाउस कोर्टानं निर्भया रेप केसमधील दोषींना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील दोषींना1 फेब्रुवारीला पहाटे 6 वाजता फाशी दिली जाणार आहे.

कशी आहे शबाना आझमींची प्रकृती, कुटुंबीयांनी केला खुलासा

First published: January 23, 2020, 9:47 AM IST

ताज्या बातम्या