मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /17 वर्षांपूर्वी कंगना रणौतनं सर्वांसमोर केला होता करण जोहरचा असा अपमान; VIDEO पुन्हा होतोय VIRAL

17 वर्षांपूर्वी कंगना रणौतनं सर्वांसमोर केला होता करण जोहरचा असा अपमान; VIDEO पुन्हा होतोय VIRAL

चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री कंगना रणौत  (Kangana Ranuat )  जितकी तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते तितकीच ती तिच्या बिनधास्त शैलीसाठी ओळखली जाते. बॉलिवूडमध्ये, कंगना अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी स्वतःच्या अटींवर काम करते.

चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranuat ) जितकी तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते तितकीच ती तिच्या बिनधास्त शैलीसाठी ओळखली जाते. बॉलिवूडमध्ये, कंगना अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी स्वतःच्या अटींवर काम करते.

चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranuat ) जितकी तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते तितकीच ती तिच्या बिनधास्त शैलीसाठी ओळखली जाते. बॉलिवूडमध्ये, कंगना अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी स्वतःच्या अटींवर काम करते.

पुढे वाचा ...

मुंबई, 5 नोव्हेंबर- चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री कंगना रणौत  (Kangana Ranuat )  जितकी तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते तितकीच ती तिच्या बिनधास्त शैलीसाठी ओळखली जाते. बॉलिवूडमध्ये, कंगना अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी स्वतःच्या अटींवर काम करते. ती सर्व मुद्द्यांवर आपले मत उघडपणे मांडते. घराणेशाहीच्या मुद्द्यावरून कंगना अनेकदा बॉलिवूडमधील बड्या घरांना लक्ष्य करते. या मुद्द्यावर ती अनेकदा चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरला घेरते. तसं पाहिलं तर तिचा आणि करण जोहरसोबतचा (Karan Johar)  हा कोल्ड वार आजचा नाही. तो खूप जुना आहे.

View this post on Instagram

A post shared by ♡︎ (@_.queen_.kangana._)

सध्या सोशल मीडियावर कंगना रणौत आणि करण जोहरचा एक जुना व्हिडिओ व्हायरल  (Viral Video)  होत आहे. हा व्हिडिओ कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला आहे. तिची पूर्ण वृत्ती यात दिसून येते. हा व्हिडिओ 2007 सालचा आहे. जेव्हा तिला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता. करण जोहर हा पुरस्कार सोहळा होस्ट करत होता. करण कंगनाचे नाव घेतो आणि जाहीर करतो की हा पुरस्कार सार्वजनिक सर्वेक्षणाद्वारे ठरविला गेला आहे. तसेच तो म्हणतो, 'गेल्या तीन वर्षांपासून मी जिंकत होतो.' त्यानंतर तो कंगनाचे नाव घेतो.

कंगना हसतमुखाने पुरस्कार स्वीकारते आणि मंचावरून सर्वांचे आभार मानते. पण करणचे नाव घेत नाही. जेव्हा ती ट्रॉफी घेऊन स्टेज सोडत होती. तेव्हा करण जोहरला तिच्याशी काहीतरी बोलायचे होते. पण ती पुढे गेली. करण अवाक झाला. तो हसतो आणि म्हणतो, “धन्यवाद कंगना, अभिनंदन. मी इथे आहे." पण करणच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत कंगना पुढे जाते. तेव्हा करण म्हणतो, 'नो प्रॉब्लेम कंगना, वेल्डन'. कंगनाचे चाहते हा व्हिडिओ प्रचंड शेअर करत आहेत.

( हे वाचा:दिवाळीच्या शुभमुहूर्तावर आलिया-रणबीरनं घेतलं काली मातेचं दर्शन! ट्रॅडिशनल LOOK)

इन्स्टाग्राम स्टोरीवर व्हिडिओ शेअर करताना कंगना रणौतने लिहिलं की, 'माझा ऍटिट्यूड आधीपासून असाच आहे'. तसेच तिने लिहिलं आहे की, 'हे माझं इंडस्ट्रीतील पहिलं वर्ष होतं. मी किशोरवयीन होते पण तरीही माझा ऍटिट्यूड असाच होता. कंगनाला नुकताच सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. 2019 मध्ये 'मणिकर्णिका' आणि 'पंगा'साठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. कंगना रणौतला यापूर्वी 'फॅशन' आणि 'तनु वेड्स मनु रिटर्न्स'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

First published:
top videos

    Tags: Bollywood, Entertainment, Kangana ranaut