मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'सेलिब्रिटी असली तर आरोपीही आहे'; कंगनाला मानहानी केसमध्ये कोर्टाने फटकारलं

'सेलिब्रिटी असली तर आरोपीही आहे'; कंगनाला मानहानी केसमध्ये कोर्टाने फटकारलं

कंगना रनौत आणि गीतकार जावेद (Kangana Ranaut Javed Akhtar Defamation Case) अख्तर यांच्यादरम्यान सुरू असलेल्या मानहानी खटल्यात अनेक दिवसांपासून सुनावणी सुरू आहे.

कंगना रनौत आणि गीतकार जावेद (Kangana Ranaut Javed Akhtar Defamation Case) अख्तर यांच्यादरम्यान सुरू असलेल्या मानहानी खटल्यात अनेक दिवसांपासून सुनावणी सुरू आहे.

कंगना रनौत आणि गीतकार जावेद (Kangana Ranaut Javed Akhtar Defamation Case) अख्तर यांच्यादरम्यान सुरू असलेल्या मानहानी खटल्यात अनेक दिवसांपासून सुनावणी सुरू आहे.

  • Published by:  Meenal Gangurde
मुंबई, 24 मार्च : कंगना रनौत आणि गीतकार जावेद (Kangana Ranaut Javed Akhtar Defamation Case) अख्तर यांच्यादरम्यान सुरू असलेल्या मानहानी खटल्यात अनेक दिवसांपासून सुनावणी सुरू आहे. कंगना मात्र या सुनावणीदरम्यान हजरच राहत नाही. आजही सुनावणीदरम्यान कंगना कोर्टात हजर नव्हती. यावरुन कोर्टाने नाराजी व्यक्त केली आणि कंगनाला चांगलच फटकारलं. कोर्टाने सांगितलं की, कंगना आपल्या व्यावसायिका कामात व्यग्र आहे, मात्र ती कोणत्या तरी प्रकरणात आरोपी आहे, हे विसरून नये. कंगना रनौत (Kangana Ranaut) हिने नुकतीच अंधेरी मेट्रोपोल‍िटन मॅज‍िस्‍ट्रेटमध्ये याचिका दाखल केली होती. यानुसार, लेखक जावेद अख्‍तर (Javed Akhtar) यांच्या केसमध्ये हजर होण्यापासून सवलत मिळावी अशी मागणी केली होती. मात्र कोर्टाने तिची ही याचिका फेटाळली. कंगना कथितपणे या प्रकरणात केवळ दोन वेळा कोर्टात हजर राहिली आहे. पहिल्यांदा सुनावणी झाली त्यावेळी आणि दुसऱ्यांदा जेव्हा तिने मॅजिस्ट्रेट विरोधात पक्षपात केल्याचा आरोप केला होता त्यावेळी... मॅजिस्ट्रेटने कंगना रणौतला फटकारलं... ईटाइम्सने एका न्यूज पोर्टलचा हवाला देत सांगितलं की, मॅजिस्ट्रेट आरआर खान (Magistrate RR Khan Court) म्हणाले की, कंगना रनौत (Kangana Ranaut Appeal)  कथितपणे या प्रकरणाच्या सुनावणीसाठी आपल्या नियमांनुसार ठरवत आहे. यावेळी त्यांनी कंगनाला या प्रकरणात सवलत देण्यास नकार दिला. यावेळी मॅजिस्ट्रेट म्हणाले की, कंगनाला कायदेशीर स्थापित प्रक्रिया आणि आपल्या  तौर पर ‘इस मामले की सुनवाई के लिए अपनीजामीन बांडचे नियम आणि अटींचं पालन करावं लागेल. हे ही वाचा-The Kashmir Files च्या दिग्दर्शकाला जीवाची भीती, विवेक अग्निहोत्रींच्या ऑफिसमध्ये घुसून दोघांची मॅनेजरला धक्काबुक्की जावेद अख्तर यांना म्हणाली होती, सुसाइड गँगचा भाग... मॅजिस्ट्रेट आरआर खान पुढे म्हणाले की, ती एक सेलिब्रिटी आहे. त्यांची व्यावसायिक कामं असू शकतात, मात्र त्या या प्रकरणात आरोपी आहे हे विसरू शकत नाहीत. 2020 मध्ये सुशांत सिंह राजपूतच्या (Sushan Sing Rajput Death) निधनानंतर कंगना रणौतने एका मुलाखतीत जावेद अख्तर यांचं नाव घेत त्यांना ‘सुसाइड गँग’चा भाग असल्याचं सांगितलं होतं. जे बाहेरून बॉलिवूडमध्ये येणाऱ्या कलाकारांना आत्महत्या करायला प्रवृत्त करतात. यानंतर जावेद अख्तर (Javed Akhtar Complaint Against Kangana Ranaut) यांवी कंगनाविरोधात मानहानीची केस दाखल केली होती. सध्या या प्रकरणात कंगनाविरोधीत आरोप निश्चित केले जाणार आहेत.
First published:

Tags: Kangana ranaut

पुढील बातम्या