'या' आहेत बॉलवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या टॉप 10 अभिनेत्री

सध्या बॉलिवूडमध्ये स्त्रीप्रधान सिनेमांची निर्मिती केली जात आहे. त्यामुळे अभिनेत्री फक्त हिरोइन पुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत तर त्यांच्या अभिनयालाही वाव मिळाला. परिणामी अभिनेत्रींनी त्यांच्या मानधनात वाढ केली.

  • Share this:

सध्या बॉलिवूडमध्ये स्त्रीप्रधान सिनेमांची निर्मिती केली जात आहे. त्यामुळे अभिनेत्री फक्त हिरोइन पुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत तर त्यांच्या अभिनयालाही वाव मिळाला आणि त्या प्रमुख भूमिकांमध्येही दिसू लागल्या. याचाच परिणाम म्हणून अभिनेत्रींनी त्यांच्या मानधनात वाढ केली. जाणून घेऊयात कोण आहेत बॉलिवूडमधील टॉप 10 सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री...

सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांच्या यादीत कंगनाचा सर्वात वरचा क्रमांक लागतो. ती एका सिनेमासाठी 15 कोटी मानधन घेते.

बॉलिवूडची मस्तानी म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री अभिनेत्री दीपिका पदुकोण सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. दीपिका एका सिनेमासाठी 14 कोटी एवढं मानधन घेते. ती लवकरच मेघना गुलजारच्या 'छपाक' सिनेमामधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा मागच्या बऱ्याच काळापासून बॉलिवूडपासून दूर आहे. लवकरच ती 'द स्काय इज पिंक' मधून पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. सर्वाधिक मानधन घेणाऱ्यां अभिनेत्रींमध्ये प्रियांकाचा तिसरा क्रमांक लागतो. ती एका सिनेमासाठी 13 कोटींचं मानधन घेते.

अभिनेत्री करिना कपूर लवकरच 'अंग्रेजी मीडियम'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ती एका पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. करिना एका सिनेमासाठी 11.5 कोटी एवढं मानधन घेते. 'अंग्रेजी मीडियम' व्यतिरिक्त करिना 'गुड न्यूज' आणि 'तख्त' या दोन सिनेमांमध्येही दिसणार आहे.

अभिनेत्री कतरिना कैफ सध्या भारत सिनेमामुळे चर्चेत आहे. कतरिना सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. ती एका सिनेमासाठी 11 कोटी एवढं मानधन घेते. लवकरच कतरिना अक्षय कुमार सोबत 'सूर्यवंशी'मध्ये दिसणार आहे.

फॅशनिस्टा सोनम कपूर एका सिनेमासाठी 10.5 कोटी एवढं मानधन घेते. सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रीमध्ये तिचा सहावा क्रमांक लागतो. तिचा 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' सिनेमा मात्र बॉक्स ऑफिसवर फारशी चमक दाखवू शकला नाही.

अभिनेत्री विद्या बालन शक्यतो स्त्रीप्रधान भूमिकांना प्राधान्य देते. विद्या एका सिनेमासाठी 9.5 कोटी एवढं मानधन घेते. लवकरच ती इंदिरा गांधीच्या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. तसेच तिचा 'मिशन मंगल' हा सिनेमा येत्या 15 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या सर्वाधिक चर्चेत आहे ती तिचा आगामी सिनेमा 'साहो'मुळे. या सिनेमात ती साउथ सुपरस्टार प्रभास सोबत स्क्रीन शेअर करणार आहे. श्रद्धा एका सिनेमासाठी 9 कोटींचं मानधन घेते.

अभिनेत्री अनुष्का शर्मानं क्रिकेटर विराट कोहलीशी लग्नाच्या बेडीत अडकल्यानंतर कोणताही नवा सिनेमा साइन केलेला नाही. त्यामुळे ती बॉलिवूड सोडणार की काय अशी शंका उपस्थित होत आहे. अनुष्का एका सिनेमासाठी 8 कोटींचं मानधन घेते.

अभिनेत्री आलिया भट सध्या बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. ती लवकरच अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आलिया एका सिनेमासाठी 7.5 कोटींचं मानधन घेते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 17, 2019 04:25 PM IST

ताज्या बातम्या