Home /News /entertainment /

कंगना रणौतच्या मुंबईतील ऑफिसमध्ये घुसले BMC अधिकारी; अभिनेत्रीने VIDEO शेअर करत केला आरोप

कंगना रणौतच्या मुंबईतील ऑफिसमध्ये घुसले BMC अधिकारी; अभिनेत्रीने VIDEO शेअर करत केला आरोप

अभिनेत्री कंगना रणौतने (kangana ranaut) BMC चे अधिकारी जबरदस्ती आपल्या कार्यालयात घुसल्याचा आरोप केला आहे.

    मुंबई, 07 सप्टेंबर : अभिनेत्री कंगना रणौतला (Kangana ranaut) शिवसेनेशी पंगा घेणं चांगलंच महागात पडत आहे. कंगनाच्या मुंबईतील ऑफिसमध्ये (Kangana ranaut office) मुंबई महपालिकेचे अधिकारी आले आहेत. कोणतीही नोटीस न  देता बीएमसी अधिकारी आपल्या ऑफिसमध्ये जबरदस्ती घुसल्याचा आरोप कंगनाने केला आहे. कंगनाने याचा व्हिडीओही आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. कंगनाने ट्वीट केलं आहे, "बीएमसी अधिकारी जबरदस्ती माझ्या ऑफिसची तपासणी करत आहे. जेव्हा शेजाऱ्यांनी याबाबत विचारणा केली, तेव्हा त्यांनी त्यांचाही छळ केला. 'त्या ज्या मॅडम आहे त्यांनी जे काही केलं आहे, त्याचे परिणाम सर्वांना भोगावे लागतील', अशी भाषा त्यांनी वापरली" कंगना पुढे म्हणाली, "माझ्याकडे या कार्यालयाची सर्व कागदपत्रं, बीएमसीची परवानगी आहे. माझ्या संपत्तीत काहीही बेकायदेशीर नाही. तसं काही असेल तर बीएमसीने बेकायदेशीर बांधकामाची नोटीस पाठवायला हवी होती. मात्र कोणत्याही नोटिशीशिवाय त्यांनी माझ्या जागेवर छापा टाकला आहे आणि उद्या ते सर्वकाही उद्ध्वस्त करतील" कंगनाने आपल्या या ऑफिसचाही व्हिडीओ शेअर केला आहे, कंगना म्हणाली, "हे माझं मुंबईतील मणिकर्णिका फिल्म्जचं ऑफिस आहे. जे मी पंधरा वर्षे मेहनत करून कमवलं आहे. मी जेव्हा निर्माता बनेन तेव्हा माझं स्वतःचं कार्यालय असावं, माझं आयुष्यात एकच स्वप्न होतं. मात्र आता वाटतं हे स्वप्नं तुटण्याची वेळ आली आहे. तिथं आज अचानक मुंबई महापालिकेचे काही लोक आले आहेत" अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेनेमध्ये वाद चांगलाच पेटला आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांची बदनामी केल्या प्रकरणी कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी कंगनावर कारवाई करण्याची मागणी करणारे पत्र विधानसभा अध्यक्षांकडे दिलं आहे. सध्या विधानसभा उपाध्यक्ष उपस्थित असल्यामुळे त्यांच्याकडे हे पत्र देण्यात आले आहे. हे वाचा - एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे पूर्ण करतेय सुशांतचं स्वप्नं; पाहा VIDEO या पत्रात कंगना रणौत हिच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात विधानसभेत एकमताने ठराव पारीत करावा अशी मागणी प्रताप सरनाईक यांनी केली आहे. त्यांच्या या मागणी करणाऱ्या पत्रावर तातडीने कार्यवाही करून अहवाल सादर करावा, असे आदेश विधानसभा उपाध्यक्षांनी दिले आहे. कंगनाला Y प्लस दर्जाची सुरक्षा दरम्यान, कंगना विरुद्ध शिवसेना वादात केंद्रीय मंत्री अमित शहांनी उडी घेतली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने कंगनाला आता Y प्लस दर्जाची सुरक्षा पुरवली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंगना रणौतविरोधात सुरू असलेल्या आंदोलनामुळे तिला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून Y दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. राज्य सरकारने या प्रकरणात घेतलेली भूमिका पाहता केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. हे वाचा - कंगनाला मिळाली Y दर्जाची सुरक्षा, अमित शहांचे मानले आभार Y दर्जाच्या सुरक्षेमध्ये एकूण 11 सुरक्षा कर्मचारी तैनात असतात. यात दोन कमांडो तैनात असतात. ही सुरक्षा 24x7 असते. आता ही सुरक्षा व्यवस्था थेट सीआरपीएफ सांभाळू शकते.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: BMC, Kangana ranaut

    पुढील बातम्या