कंगना रणौतच्या वकिलाकडून पत्रकाराला नोटीस, बहीण रंगोलीनं केलं 'हे' ट्वीट

कंगना रणौतच्या वकिलाकडून पत्रकाराला नोटीस, बहीण रंगोलीनं केलं 'हे' ट्वीट

मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेला कंगना विरूद्ध पत्रकार वाद इतक्यात संपायची चिन्हं दिसत नाहीत.

  • Share this:

मुंबई, 12 जुलै : सध्या बॉलिवूडमध्ये कंगना रणौतचं नाव प्रेस कॉन्फरन्समध्ये झालेल्या एका वादामुळे प्रचंड चर्चेत आहे. ‘जजमेंटल है क्या’ सिनेमाच्या एका कार्यक्रमाच्या दरम्यान एका पत्रकाराशी वाद घातल्यानं कंगना चर्चेत आली आहे. या प्रकारावर या सिनेमाचे निर्माते बालाजी फिल्मनं एक फत्रक प्रसिद्ध करत माफी मागितली. मात्र कंगनानं आक्रमक पवित्रा घेत बहीण रंगोली चंडेलच्या ट्वीटरवर व्हिडिओ शेअर करत पत्रकाराला देशद्रोही म्हटलं होतं. तसेच या बॅनच्या धमक्यांची मला भीती वाटत नाही असं सांगितलं होतं.

या सर्व प्रकारानंतर आता कंगनाच्या वकिलांनी या पत्रकाराच्या विरोधात मानहानीची लीगल नोटीस काढली आहे. या नोटीसमध्ये, काही पत्रकार त्याच्या जर्नलिस्टिक नॉर्मसचं उल्लंघन करत आहेत, गुन्हेगारीची कृत्य करत आहेत. असे आरोप केले आहेत. तसेच हे पत्रकार माझ्या क्लायंटची सार्वजनिक ठिकणी मानहानी करत असून तिला त्रास देत असल्याचंही या नोटीसमध्ये म्हटलं आहे.

Underwater शूटनंतर प्रेग्नंट समीराने 9 व्या महिन्यात शेअर केला No makeup VIDEO

कंगनाच्या वकिलानं त्यांच्या नोटीसमध्ये म्हटलं आहे, दुर्भाग्य आहे की असे काही पत्रकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग करत लोकांची प्रतिमा खराब करत आहेत. तसेच ‘Entertainment Journalist Guild of India’ रजिस्टर नसल्याचं म्हणतं त्यांच्या नोटीसवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या नोटीस नुसार काही पत्रकार जे चुकीच्या गोष्टी पसरवत आहेत आणि क्रिमिनल अ‍ॅक्टमध्ये ज्यांचा समावेश आहे अशा व्यक्तींना साथ देऊ नये. असं सांगण्यात आलं आहे.

वयाच्या 42 वर्षी या अभिनेत्रीनं गुपचुप उरकलं लग्न? सोशल मीडियावर फोटो व्हायरल

कंगना रणौतनं पत्रकार परिषदेत एका पत्रकाराशी वाद घातल्यानंतर ‘Entertainment Journalist Guild of India’ने या प्रकरावर कंगनानं माफी मागावी असं म्हटलं होतं. अन्यथा कंगनाचा सिनेमा बॉयकॉट केला जाईल असं म्हटलं होतं. ज्यानंतर निर्माती एकता कपूरनं यावर माफी मागितली होती मात्र कंगनानं माफी मागायला नकार देत मला बॅन करा मी या धमक्यांना घाबरत नाही असं म्हटलं होतं.

Super 30 चे रिअल हिरो आनंद कुमार 'या' गंभीर आजाराशी देतायत झुंज

पत्रकाराच्या विरोधात कंगनाच्या वकिलानं नोटीस काढल्यानंतर तिची बहीण रंगोली चंडेलनं एक ट्वीट केलं. ज्यात, ‘सर आपण ही दुकानं बंद करू आणि या सर्वांना जेलमध्ये पाठवू. क्रिमिनल कुठले. तुमची हिंमत कशी झाली कंगनाला अशाप्रकारे धमकी देऊन घाबरवण्याची’ असं तिनं म्हटलं आहे.

आता अनुष्काच्या मागे लागले युझर, सुई धागाच्या जाळ्यात अडकला विराट कोहली

================================================================

VIDEO: विठुरायाच्या दरबारात मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली खंत

First published: July 12, 2019, 2:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading