"करण-आलिया व्हायरस; उंदरानो पुन्हा बिळात जा नाहीतर..." कंगनाने फिल्मी स्टाइल साधला निशाणा

#Boycott_Kangana ट्रेंड करणाऱ्यांना कंगना रणौतने (kangana ranauat) उत्तर दिलं आहे.

  • Share this:

मुंबई, 24 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूनंतर बॉलिवूडमधील इनसायडर-आऊटसायडर, मुव्ही माफिया  आणि नेपोटिझमवरून वाद सुरू आहे. अभिनेत्री कंगना रणौत  (Kangana Ranaut) तर यावरून सातत्याने सेलिब्रिटींवर निशाणा साधत आहे. दरम्यान कंगनालाही सोशल मीडियावर ट्रोल केलं जाऊ लागलं आणि याबाबत कंगनाने याला उत्तर दिलं आहे.

सोशल मीडियावर #Boycott_Kangana हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला. यावर प्रतिक्रिया देताना कंगनाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक मीम शेअर केलं आहे. यामध्ये कंगनाने स्वत:ला सॅनिटायझर म्हटलं आहे आणि करण जोहर, वरुण धवन, आलिया भट्ट, रणबीर कपूरला व्हायरस म्हटलं आहे.

कंगनाने हे मीम ट्वीट करताना म्हटलं, उंदरानो पुन्हा बिळात जा नाहीतर गब्बर येईल. फिल्मी स्टाइल हुल द्यायची असेल तर ती अशी देतात. हॅशटॅग बॉयकॉट कंगना ट्रेंडमुळे मला भीती नाही वाटत. जा आणि काहीतरी दुसरा प्रयत्न करा", असं एकदम फिल्मी अंदाजात कंगनाने या चौघांवरही निशाणा साधला आहे.

हे वाचा - सचिन त्यागी कोरोना पॉझिटिव्ह; 'ये रिश्ता क्या कहलाता है'च्या शूटिंगला ब्रेक

काही दिवसांपूर्वीच कंगनाने करण जोहरचा पद्मश्री पुरस्कार काढून घ्यााव, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली होती. याबाबत तिनं ट्वीट केलं होतं. कंगना म्हणाली, "करण जोहरचा पद्मश्री पुरस्कार काढून घ्यावा, अशी विनंती मी भारत सरकारला करते. त्याने एका आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर बोलताना मी ही इंडस्ट्री सोडून जाण्याबाबत भाष्य केलं होतं. त्याने सुशांतचं करिअर संपवलं, उरी हल्ल्यावेळीही त्याने पाकिस्तानला पाठिंबा दिला होता आणि आता आपल्या भारतीय सैन्याबाबत देशद्रोही फिल्म बनवली आहे" गुंजन सक्सेना चित्रपटावरून तिनं करणला लक्ष्य केलं होतं.

Published by: Priya Lad
First published: August 24, 2020, 9:39 PM IST

ताज्या बातम्या