"पुलवामात जितके जवान मारले गेले त्यापेक्षा जास्त निरागस जीव मुंबईत गेले", CM ठाकरे, BMC वर कंगना पुन्हा बरसली

भिवंडी इमारत दुर्घटनेवरून (bhiwandi building collapse) अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana ranauat) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई महापालिकेला सुनावलं आहे.

  • Share this:

मुंबई, 24 सप्टेंबर : मुंबई पाक झाली आहे, असं म्हणून वादात अडकलेल्या अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) पुन्हा एकदा याच मुद्द्यावरून मुंबई महापालिका (bmc)  आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. भिवंडी इमारत दुर्घटनेवरून कंगना रणौतने पुन्हा निशाणा साधला आहे. पुलवामा, पाकिस्तानात जितके जवाना मारले जात नाहीत, त्यापेक्षा जास्त जीव मुंबईत गेले, असं म्हणत कंगना पुन्हा बरसली आहे.

भिवंडी इमारत दुर्घटनेवरून कंगना रणौतने ठाकरे सरकार आणि मुंबई महापालिका प्रशासनाला सुनावलं आहे. माझं घर तोडण्याऐवजी जर या बिल्डिंगकडे लक्ष दिलं असतं तर आज जवळपास 50 लोकांचा जीव वाचला असता, असं कंगनाने म्हटलं आहे. कंगनाने याबाबत ट्वीट केलं आहे.

कंगना म्हणाली, "जेव्हा बेकायदेशीरित्या माझं घर तोडत होता, तेव्हा तितकं लक्ष या बिल्डिंगकडे दिलं असतं. तर आज जवळपास हे 50 लोक जिवंत असते. जितक्या निरागस लोकांचा तुमच्या हलगर्जीपणामुळे जीव गेला तितके जवान तर पुलवामामध्ये पाकिस्तानामध्येही मारले जात नसतील. मुंबईचं काय होणार आता देवालाच माहिती"

दरम्यान कंगनाने आफलं ऑफिसवर बीएमसीने कारवाई केल्यानंतर दाखल केलेल्या याचिकेवर उद्यापासून मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. मुंबई महापालिकेनं (BMC)वांद्रे येथील पाली हिलमधील कंगनाच्या कार्यालयात तोडफोड केली होती. या कारवाईविरोधात कंगना हायकोर्टात धाव घेतली होती. मुंबई महापालिकेने कारवाई केलेली कंगनाचं वांद्रे येथील कार्यालय अद्याप तसंच पडझड झालेल्या अवस्थेत आहे, त्यामुळे कोर्टाने बीएमसीला सुनावलं आहे.  तसंच कंगनाच्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी वेळ मिळावा अशी मागणी करणाऱ्या पालिकेचे हायकोर्टाने कान टोचले आहे. कारवाई मात्र लगेच करता, पण आता याचिकेवर उत्तर देण्यासाठी  तुम्हाला आता अधिक वेळ हवा आहे, असं म्हणत कोर्टाने सुनवलं. शिवसेना खासदार संजय राऊत, मुंबई महापालिकेला याप्रकरणी उत्तर देण्यासाठी हायकोर्टाने आता एक आठवड्याची मुदत दिली आहे.

मुंबई हायकोर्टाने बीएमसीला फटकारल्यावर भल्याभल्यांना रडू आणणारी अभिनेत्री कंगना रणौतच्या डोळ्यात चक्क पाणी आलं. तिनं हात जोडून न्यायालयाचे आभार मानले आहेत.

Published by: Priya Lad
First published: September 24, 2020, 5:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading