#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार

#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार

सध्या बाॅलिवूडमध्ये #Metooचं वादळ घोंगावतेय. कंगना रणौतनंही दोन मोठ्या हस्तींवर आपला निशाणा साधलाय.

  • Share this:

मुंबई, 15 आॅक्टोबर : सध्या बाॅलिवूडमध्ये #Metooचं वादळ घोंगावतेय. कंगना रणौतनंही दोन मोठ्या हस्तींवर आपला निशाणा साधलाय.कंगनानं आपल्या नेहमीच्या सडेतोड पद्धतीनं काही मुद्दे मांडलेत.

कंगनानं दिग्दर्शक करण जोहर आणि शबाना आझमी यांच्यावर टीका केलीय. बाॅलिवूडमध्ये #MeTooचं इतकं सगळं चाललेलं असताना करण जोहर आणि शबाना आझमी गप्प का? असा सवाल कंगनानं विचारलाय. एरवी अनेक सामाजिक विषयावर आपली मतं मांडणारी ही मंडळी आता का बोलत नाहीत, असं कंगनानं विचारलंय. ती पुढे असंही म्हणाला, ' करणकडे एअरपोर्ट लूक, जिम लूक यावर ट्विट करायला वेळ आहे. पण जिथे त्याची रोजीरोटी आहे, तिथल्या घटनांकडे तो दुर्लक्ष कसा काय करू शकतो?'

आतापर्यंत नाना पाटेकर, आलोक नाथ, सुभाष घई, कैलाश खेर, रजत कपूर, विकास बहल, श्याम कौशल यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप लागलेत.  तनुश्रीच्या बाजूनं प्रियांका चोप्रा, परिणिती चोप्रा,  स्वरा भास्कर, ऋचा चड्डा यांनी ट्विट केलं. पण बाॅलिवूडमधले अनेक जण गप्प बसल्याबद्दल कंगनानं राग व्यक्त केलाय.

Metoo मोहिमेला बॉलिवूडमधल्या ११ महिला दिग्दर्शिकांनी पाठिंबा जाहीर केला आहे. तसंच यापुढे लैंगिक छळाचे आरोप सिद्ध झालेल्यांसोबत काम न करण्याची भूमिका त्यांनी घेतली. अभिनेत्री कोंकणा सेन शर्माने ट्विटरवरुन ही माहिती दिली. रुची नारायण, सोनाली बोस, नंदिता दास, नित्या मेहरा, रीमा कगटी, किरण राव, मेघना गुलजार, अलंकृता श्रीवास्तव, गौरी शिंदे आणि झोया अख्तर या ११ महिला दिग्दर्शिकांची #Metoo मोहिमेला आपला पाठिंबा दर्शवला आहे.

पुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 15, 2018 03:01 PM IST

ताज्या बातम्या